शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांकडून बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: December 17, 2015 01:26 IST

आवाडेतील शेतकरी हवालदिल : वनविभागाचे दुर्लक्ष, भरपाई देण्याची मागणी

कसई दोडामार्ग : सहा गव्यांच्या कळपाने आवाडे-वेळपईवाडी येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे ७०० केळीची रोपे मंगळवारी रात्री उद्ध्वस्त केली. वनविभागाने आमच्या बागायती ताब्यात घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी केली आहे.वेळपईवाडीत गव्यांचा वावर वाढला असून सहा गवे या परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वेळपईवाडीत नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी सुमारे १५०० केळींची लागवड केली आहे. केळीच्या रोपांना तीन महिने झाले आहेत. बागायतीत गव्यांचा वावर वाढत असल्याने अ‍ॅटमबॉम्ब, फटाक्यांचा आवाज करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याबाबत वनविभागालाही कळविण्यात आले आहे. वनविभागाचे कर्मचारी कायद्याच्या चौकटीत राहून तुटपुंजा पंचनामा करत आहेत. यामुळे शेतकरी भरडला जात आहे. शासन नियमानुसार पीक मुळासहीत उन्मळून टाकली, तरच त्या पिकांचा पंचनामा केला जातो. कायद्याच्या नियमाप्रमाणे वनकर्मचारी पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी रात्री सहा गव्यांच्या कळपाने वेळपईवाडीतील केळी, बागायतीत घुसखोरी केली. नंदकिशोर, गुरूनाथ, संजय यांच्या बागायतीतील केळी गव्यांनी पूर्ण फस्त केल्या. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. शिवाय उर्वरित बागायतीच्या संरक्षणासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)न्याय द्या : नंदकिशोर दळवीगवा रेड्यांनी किंवा अन्य वन्य प्राण्यांनी पूर्ण ओरबाडून खालेले पीक जगणे कठीण आहे. वस्तूनिष्ठ परिस्थिती पाहून वन्यप्राण्यांकडून खाल्ले गेलेले पीक जिवंत राहील काय, त्या पिकापासून फळधारणा होईल काय, याचा विचार करून अशा रोपांचा पंचनामा करावा. शिवाय त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खास बाब म्हणून या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदकिशोर दळवी यांनी केली आहे.