शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभाग १६ योजना राबविणार

By admin | Updated: May 21, 2015 00:09 IST

रणजित देसाई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद दुग्धविकास समितीची सभा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेतून ४ व जिल्हा परिषद सेस अनुदानातून १२ अशा एकूण १६ योजना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहेत. यासाठी १ कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १ ते ३० जूनपर्यंत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सभेत केले.जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य धोंडू पवार, दिलीप रावराणे, आत्माराम पाळेकर, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. एस. के. चंदेल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १९ योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकडील दुभत्या जनावरांपैकी भाकड जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करणे या योजनेसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, २०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. ५० टक्के अनुदानावर खाद्याचा पुरवठा करणे- तरतूद ७ लाख, एकात्मिक कुक्कुट विकास योजनेंतर्गत एक दिवसीय १०० पिलांचा पुरवठा करणे- १२ लाख, वैरण विकास योजना- १५ लाख, ७५ टक्के अनुदानावर शेळी गट पुरविणे- १२ लाख, ४० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे- ४० लाख, ९० टक्के अनुदानावर फॅट मशीनचा पुरवठा करणे- ५ लाख, ७५ टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा करणे- ५ लाख, १०० टक्के अनुदानावर पशुपालकांना प्रशिक्षण देणे- १ लाख, १०० टक्के अनुदानावर सकस चारा निर्मितीसाठी अर्थसाहाय्य करणे- २ लाख ५० हजार, महिलांना सबलीकरणासाठी ९० टक्के अनुदानावर सुधारित जातीच्या २ आठवडे वयाच्या ५० कुक्कुट पिलांचा पुरवठा करणे- ४ लाख ५० हजार, ९० टक्के अनुदानावर दुधाची किटली, घमेले व फावडे यांचा पुरवठा करणे- ४ लाख ५० हजार, ९० टक्के अनुदानावर मूरघास तयार करण्याच्या बॅगचा पुरवठा करणे- १ लाख ८० हजार, ७५ टक्के अनुदानावर रबरी मॅटचा पुरवठा करणे- ३ लाख ७५ हजार, ७५ टक्के अनुदानावर हायड्रोकोनिक चारा निर्मितीसाठी अर्थसहाय्य- ३ लाख तर ७५ टक्के अनुदानावर लघुअंडी उबवणी यंत्राचा पुरवठा करणे- ३ लाख अशा प्रथम चार योजना जिल्हा वार्षिक योजनेतून तर १२ योजना जिल्हा परिषद अनुदानातून राबविण्यात येत आहेत. यासाठी १ ते ३० जून या कालावधीत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी मंगळवारी पशुसंवर्धन समिती सभेत केले आहे. जिल्ह्यातील ४२ संस्थांना फॅट मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे, तर उर्वरितांना चालू वर्षी मशीन देणार असल्याचेही देसाई यांनी सभेत सांगितले. (प्रतिनिधी)