शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

डेंग्यूची साथ आटोक्यात

By admin | Updated: December 11, 2014 00:35 IST

रुग्णांची संख्या २१ : आरोग्यपथक २४ तास कार्यरत

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतर फणसवळे गावातील कोंडवाडी व आंबेकरवाडीतील डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. दरम्यान, दाखल असलेल्या रुग्णांपैकी आणखी एकास डेंग्यूची लागण असल्याचे काल, मंगळवारी रात्री स्पष्ट झाल्याने रुग्णांची संख्या २१ झाली आहे़ साथग्रस्त फणसवळे गावात जिल्हा परिषदेचे आरोग्यपथक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले असून, ते पथक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करीत आहे़ येथील कोणाला ताप येऊ नये, यासाठी या आरोग्य पथकाकडून काळजी घेण्यात येत आहे़ आतापर्र्यंत फणसवळेमध्ये तापाचे ७० रुग्ण सापडले असून, त्यामध्ये २१ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ आतापर्यंत डेंग्यूच्या जिल्ह्यातील साथीमध्ये फणसवळेतील डेंग्यूची सर्वांत मोठी साथ आहे़ त्यामुळे आरोग्य विभागाने फार गांभीर्याने याकडे लक्ष देऊन गावातील सर्वच पाणी साठविण्याच्या भांड्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली असून, त्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्या नाहीत़ तरीही कोरडा दिवस पाळण्यात आला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये फणसवळेतील आतापर्यंत तापाचे ४५ रुग्ण दाखल करण्यात आले होते़ त्यापैकी सात रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे़ इतर रुग्णांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे़ तसेच आज, बुधवारी फणसवळे परिसरामध्ये एकही तापाचा रुग्ण आढळून आलेला नाही़ त्यामुळे येथील तापाची साथही आटोक्यात आली आहे़ (शहर वार्ताहर)