शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

डेंग्यू सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

रत्नागिरी जिल्हा : नागरिकांमध्ये होतेय जागरूकता

रत्नागिरी : संपूर्ण जिल्ह्यात नव्हे; तर अवघ्या राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. शासकीय तसेच खासगी रूग्णालयात डेंग्यूचे रूग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूची भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होत असल्यामुळे नागरिकांकडून खबरदारी म्हणून डास प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘स्वच्छ व सुंंदर भारत’ संकल्पना राबवण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये सरसावली आहेत. त्याच अनुषंगाने डेंग्यूपासून बचावासाठी खबरदारी म्हणून नागरिकदेखील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खबरदारी घेत आहेत. नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सफाईबरोबर गवतकटाई करीत आहेत. ग्रामीण भागात तर डास प्रतिबंध म्हणून चक्क नारळाची सोडणे, गवऱ्या यांचा धूर करण्यात येत आहे.डास चाऊ नये, यासाठी नागरिकांकडून ओडोमाससारख्या प्रसाधनांचा वापर वाढू लागला आहे. गुडनाईट अ‍ॅडव्हान्सला मागणी वाढू लागली आहे. शिवाय क्वाईलसचाही खप वाढला आहे. मच्छरदाणी हा डासापासून संरक्षणासाठी प्रभावी उपाय पारंपरिक आहे. मात्र, छोट्या घरात मच्छरदाणी लावणे शक्य होत नसल्यामुळे त्याऐवजी ओडोमाससारखी प्रसाधने किंवा गुडनाईटचा वापर वाढला आहे. बालकांसाठी तर आवर्जून मच्छरदाणीचा वापर करण्यात येत आहे. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेस कमी होतात. प्लेटलेटस वाढण्यासाठी काळा खजूर तसेच अंजीरचा वापर उपयुक्त ठरत असल्याने काळा खजूर व सुक्या अंजीरचा खपही वाढलेला दिसून येत आहे. पपईमुळेदेखील प्लेटलेटस् वाढत असल्यामुळे पपईलाही विशेष मागणी दिसून येत आहे. डेंग्यूची फैलावणारी साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. वास्तविक नोव्हेंबरमध्ये हिवाळा असतो. परंतु यावर्षी थंडी गायब असल्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. पाणीसाठा असणाऱ्या ठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याने नागरिक जागरूक होत आहेत. (प्रतिनिधी)