शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी

By admin | Updated: October 24, 2015 00:55 IST

चिपळूण : लियाकत शहा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अडरे : पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी फारकत घेऊन राजीनामा न देता स्वतंत्र गट स्थापणाऱ्या राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सन २०११मध्ये झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ पैकी १२ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस, ४ शिवसेना, ५ शहर विकास आघाडी असे सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी १२ व काँग्रेस ३ अशी १५ सदस्य संख्या झाल्याने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सत्ता स्थापन झाली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीकरिता राष्ट्रवादीच्याच १२ नगरसेवकांपैकी निर्मला चिंगळे, तेजश्री सकपाळ, राजेश केळस्कर, शिल्पा सप्रे-भारमल, आदिती देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, शहाबुद्दिन सुर्वे व रुक्सार अलवी या ८ जणांनी स्वतंत्रपणे चिपळूण आघाडी या नावाने गट स्थापन केला. या करिता वरिल ८ जणांना कागदोपत्री पक्षातून फारकत घेतल्याचे नमूद करावे लागले तर राष्ट्रवादीचे उर्वरित ४ व काँग्रेसचे ३ मिळून ७ जणांचा राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी नावाने गट स्थापण्यात आला. पक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होवूनही ८ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादी वगळता अन्य कोणत्यातरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर ८ जणांचा गट राष्ट्रवादीचाच म्हणून अजूनही कार्यरत आहे. यावर राष्ट्रवादीतून अथवा विरोधी गटातून कोणतीही विचारणा होत नाही. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून, रत्नागिरी नगर परिषदेतील ४ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर व तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीतील ८ नगरसेवक अपात्र ठरु शकतात, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाह यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. नगर पालिकेच्या सत्तेतील सहकारी असूनही आम्हाला मासिक बैठकीकरिताही व्हीप बजावून आमची गळचेपी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)स्वतंत्र गट : राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांबाबत आक्षेपराष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडणुकीनंतर हा गट राष्ट्रवादीचाच गट म्हणून कार्यरत आहे.चार वर्षानंतरही कोणतीच कारवाई नाही.व्हीप बजावूनही गळचेपी धोरण.कोणत्याही पक्षात विलीन नाही.वरिष्ठ स्तरावरही दखल.पक्षाचे नगरसेवकपक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होऊनही आठ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादीवगळता अन्य कोणत्या तरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता हे नगरसेवक राष्ट्रवादीचेच म्हणून कार्यरत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.