शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंजनवेलचा गोपाळगड मुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

तहसीलदारांकडे मागणी : शिवतेज फाऊंडेशनची शिवजयंतीदिनी मोटारसायकल रॅली

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक जाहीर करुन काही वर्षे झाली आहेत. हा किल्ला खाजगी मालकीच्या वादात अडकल्याने पुढील कार्यवाही सरकार दरबारी थांबली असून, हा गड खाजगी मालकीमुक्त होऊन सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.दोन वर्षापूर्वी अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवतेज फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे सामाजिक व ऐतिहासिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत असताना, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त व्हावा यासाठी सातत्यसाने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी शिवप्रेमींची एक मोठी फळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून, दुसऱ्या वर्धापनदिनी १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. याबाबत सर्वांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने शृंगारतळी ते गुहागर तहसील कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा किल्ला शासनाच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा किल्ला पारतंत्र्यात आहे. जो किल्ला शिवरायांनी सागरी सुरक्षेसाठी बांधला होता, त्या गोपाळगडची तटबंदी जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खाजगी मालकाकडून हॉटेल व्यवसाय व व्यापाराकरिता होऊ शकेल, याची भीती निर्माण झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला त्वरित शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अलंकार विखारे आदींसह तालुक्यात ५०० हून अधिक शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासाठी परिसरातील शिवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोपाळगड खाजगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी हे पहिले मोठे पाऊल सर्व शिवप्रेमींच्या पाठिंब्यावर शिवतेज फाऊंडेशनने उचलले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनानंतर याबाबत सकारात्मक हालचाली होतील अशा अपेक्षा ठेवून पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.