शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:38 IST

जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश आंबोलीत आढावा बैठक ; ग्रामस्थांकडून बांधकाम अधिकारी धारेवर

आंबोली : जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.पालकमंत्र्यांनी आंबोली घाटातील खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई, उपविभागीय अभियता अनंत निकम, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, आंबोली सरपंच लीना गावडे, विलास गावडे, आगारप्रमुख शेख यांच्यासह चौकुळ येथील ग्रामस्थ तुकाराम गावडे, रुपेश गावडे, गुलाबराव गावडे, सरपंच रिता गावडे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांसमोर ग्रामस्थांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आंबोली घाटात रस्ता खचून १४ दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई बांधकाम विभागाने केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त करून दाखविला व बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बांधकाम विभागाने केवळ वेळकाढूपणा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ बांधकाम बंद करीत असल्याचा आरोप बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित हा आरोप खोडून काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी नवीन रस्ते झाले होते व जे रस्ते वाहून गेले, अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ््या यादीत टाकण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बांधकाम विभागाला ताकीद देऊन दोन दिवसांत आंबोली घाटातील रस्ता सुरळीत करून एसटी बस सुरू होईल याची व्यवस्था करा, असे पालकमंत्र्यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे बुधवारपर्यंत एसटी सुरू होईल व त्यानंतर अवजड वाहनेही सुरू होतील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग