शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

डी.टी.एड्.ला उतरती कळा

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

नवीन पिढी घडविण्याची क्षमता : अध्यापक विद्यालयांवर शाखा बंद करण्याची नामुष्की

गुरुप्रसाद मांजरेकर -- मिठबाव -बदलते शासन निर्णय, शिक्षक (नवीन) भरतीवरची बंदी आदी कारणांमुळे गेले तीन ते चार वर्षे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड्. या शिक्षण शाखेवर एक उतरती कळा आली आहे. अनेक विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांवर आपल्या शाखा बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक पार पाडत असतो. ही सर्व मूल्ये शिक्षकांवर कोरण्याचे काम त्यांच्या विद्यार्थीदशेत या शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयांनी केले आहे. शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड.्ने मागील दोन-तीन दशकात उत्कर्षाचा काळ अनुभवला. शिक्षकी पेशाची आवड असणारे आणि हमखास नोकरीची संधी म्हणून १२वी नंतर विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करायचा. आधुनिक संगणक युगात पारंपरिक शिक्षण पद्धती मागे पडत असली तरी आताची पालकपिढी आपल्या पाल्यांना आपल्या काळातील शिक्षण पद्धती व त्याचे उपयोग बऱ्याचवेळा ऐकवितात. अशावेळी या शिक्षणशास्त्र पदविकेत काही प्रमुख बदल घडविल्यास या शाखेस गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. काही बदल सद्य:स्थितीत झालेले आहेत. जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये निवृत्तीनजीक आलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय असून, पुढील काही वर्षांत शिक्षक भरती करणे शासनाला अनिवार्य ठरणार आहे. खासगी क्लासेस हा मोठा अर्थार्जनाचा मार्ग असून, याकडे मुख्यत: डी.एड.् पदविकाधारकांनी आपले लक्ष वळविणे अपेक्षित आहे.अभ्यासक्रमात विविधांगी बदलया शिक्षण अभ्यासक्रमात काही विविधांगी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विविध स्पर्धा परीक्षा उदा, बॅँक, पोस्ट, एमपीएससी, युपीएससी या परीक्षांना आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकेचे शिक्षण घेत असतानाच विविध फी माफी सवलती, शिष्यवृत्ती यांचा फायदाही या अभ्यासक्रमाला लागू आहे. नवीन शासननिर्णयानुसार डी. एड.्नंतर विद्यार्थ्याला एम. एड.्ला ही प्रवेश मिळू शकतो. ‘तो’ निर्णय स्वागतार्हप्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांना ५ वी व ८ वी चा वर्ग जोडण्याचा निर्णय शासन विचाराधीन आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे डी. एड.् बेरोजगार, सद्य:स्थितीत शिक्षण घेणारे व भविष्यातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.डी.एड. पदवीप्राप्तांना समावून घ्याडी. एड. झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळावा. तसेच विविधांगी दृष्टीने विचार करून इतर क्षेत्रातही शासनाने डी. एड. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना सामावून घेऊन बेरोजगारी कमी करावी. विद्यार्थ्यांनीही शिक्षक नोकरी व डी.एड. यांचा सहसंबंध न जोडता हा अभ्यासक्रम निवडावा, असे आवाहन डी. एड. कॉलेज शिक्षक संघटना व महाराष्ट्र टिचर एज्युकेशन असोशिएशनमार्फत करण्यात आले आहे.