शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

कामबंद आंदोलनाचा निर्णय

By admin | Updated: November 7, 2014 23:38 IST

संगणक परिचालक आक्रमक : गेल्या तीन वर्र्षापासून समस्या कायम

सिंधुदुर्गनगरी : गेली तीन वर्षे अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांच्या समस्या मिटलेल्या नाहीत. वारंवार वाढणाऱ्या समस्यांना कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी १२ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.१ एप्रिल २०११च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रामाणिकपणे काम करीत असतानाही शासनाने निर्धारीत केलेले ८ हजार रूपये मानधन त्यांना दिले जात नाही. त्याऐवजी ३५०० ते ३८०० एवढे तुटपुंजे मानधन देऊन संगणक परिचालकांची संबंधित ठेकेदारांकडून फसवणूक केली जाते. तसेच देण्यात येणारे मानधनही वेळेत देण्यात येत नाही. दोन-तीन महिने मानधन दिले जात नाही. याबाबत तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जाते. संगणक परिचालकांच्या असंघटीतपणाचा, असहाय्यतेचा आणि बेकारीचा फायदा घेऊन संबंधित ठेकेदार कंपनीकडून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अवलंबला जात आहे. गेली ३ वर्षे अविरत काम करूनही संगणक परिचालकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. संपूर्ण राज्यात २७ हजारपेक्षा जास्त युवक-युवती हे काम करीत आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३५०० एवढे जिल्ह्यातील तरूण-तरूणी या पदावर कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात यावे. वर्कआॅर्डरच्या नावाखाली कपात करण्यात येणारे वेतन वर्कआॅर्डर रद्द करून कपात केलेले वेतन मिळावे. शेअर्स म्हणून घेतलेली २०० रूपये रक्कम व्याजासह परत मिळावी. ८ हजार प्रमाणे वेतन दरमहा देण्यात यावे. दर महिन्याला १० तारखेपर्यंत वेतन खात्यावर जमा करण्यात यावे. जिल्हा व तालुकास्तरीय बैठकीचा प्रवास भत्ता मिळावा. निश्चित केलेल्या कामाव्यतिरिक्त जादा कामाचा मोबदला देण्यात यावा. सर्व संगणक परिचालकांना समान वेतन अदा करावे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा नाही अशांना अन्य ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रवासभत्ता मिळावा. संगणकासाठी देखभाल, दुरूस्ती, छपाई साहित्य वेळेत मिळावे. संग्राम सॉफ्टवेअरमधून दिल्या जाणाऱ्या दाखल्यासाठी ३ ऐवजी ८ रूपये प्रोत्साहन अनुदान द्यावे. १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना दोन संगणक परिचालक द्यावेत. सर्व ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्षामध्ये इंटरनेटसाठी ब्रॉडबॅन्ड कनेक्शन मिळावे आदी विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)विविध मागण्यांचे निवेदन सादरशुक्रवारी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच वारंवार सतावणाऱ्या समस्यांमुळे १२ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.