शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचा निर्णय एकतर्फी : साळगावकर

By admin | Updated: April 23, 2017 23:47 IST

दफनभूमीप्रकरणी आज आत्मक्लेष आंदोलन

सावंतवाडी : दफनभूमी प्रकरणात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय हा एकतर्फी आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे त्यांच्याशीच चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला असून, पालकमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात साळगावकर यांनी ‘आर या पार’ची लढाई लढण्याचे ठरविले आहे. तशी घोषणा त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते आज, सोमवारी येथील बापूसाहेब महाराज पुतळ््यासमोर एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.ख्रिश्चन समाजातील आश्रित महिलेचा मृतदेह श्रमविहार कॉलनीतील जागेत दफन करण्यात आला. या विरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठविला. त्याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाजूने निर्णय दिला. या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.संबंधित जागा ही ख्रिश्चन समाजाची दफनभूमी नाही. मग तेथे मृतदेह दफन करणे योग्य नाही. एक व्यक्ती समाजात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे. ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत त्यांच्याशीपालकमंत्री दीपक केसरकर हे चर्चा करतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि नागरिकांना न्याय द्यावा. श्रमविहार कॉलनीतील नागरिक दहशतवादामुळे बोलण्यास तयार नाहीत, असेही ते म्हणाले.बिशप आॅल्विन बरेटो हा मृतदेह काढण्यास तयार होते. पालकमंत्री केसरकर यांनीही मला तसेच करणार असल्याचे सांगितले, मात्र धर्मगुरुंशी चर्चेवेळी त्यांनी आपला निर्णय फिरविला. श्रमविहार कॉलनीतील शांत, संयमी नागरिकांवर त्यांनी आपला निर्णय लादल्याचा आरोप नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला. सावंतवाडीकरांच्या संवेदना काय असतात, हे या आंदोलनातून दाखवून देऊ, असे साळगावकर यांनी सांगितले.सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथील बापूसाहेब महाराज पुतळ््यासमोर मी एकटा आत्मक्लेष आंदोलन करणार आहे. हे आंदोलन पालकमंत्र्यांच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध म्हणून आहे, असे साळगावकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)मृतदेहाची सखोल चौकशी होणे गरजेचे श्रमविहार कॉलनीच्या मागच्या बाजूला जो मृतदेह दफन करण्यात आला आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. हा मृतदेह कोणाचा तसेच कशाने मृत्यू झाला आहे? संबंधित महिलेचा मृत्यू गोवा येथे झाला आहे. मग वैद्यकीय प्रमाणपत्र वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कसे काय? निरवडे येथील महिलेचा मृतदेह येथे आणण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणातील सर्व दोषींची चौकशीची मागणी साळगावकर यांनी केली आहे.