शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर

By admin | Updated: January 29, 2017 22:49 IST

माधव भंडारी ; युती न झाल्यास शिवसेना जबाबदार

वैभववाडी : जिल्हास्तरावर मित्रपक्षांशी युती करण्याचे अधिकार प्रदेश भाजपने स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील युतीबाबतचा निर्णय जिल्हा कार्यकारिणी घेईल, असे प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी सायंकाळी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यात युती व्हावी अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युती झाली नाही, तर त्याच्या परिणामांची जबाबदारी शिवसेनेची असेल, असेही ते म्हणाले. एका कार्यक्रमानिमित्त वैभववाडीत आले असता भंडारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे आदी उपस्थित होते. भंडारी पुढे म्हणाले की, राज्यात युती व्हावी, असा काही जिल्ह्यांचा आग्रह होता. त्यापैकीच सिंधुदुर्गही एक आहे. त्यामुळे शिवसेनेसह आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी युती करण्यासंबंधीचे सर्वाधिकार प्रदेश भाजपने जिल्हास्तरावर सोपविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युतीचा निर्णय भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घ्यावा. शिवसेनेच्या भूमिकेमुळे युती झाली नाही, तर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेची राहील, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, सत्तेतील घटक पक्षांशी युती करताना प्रदेशच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. मात्र, अन्य स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत पूर्वपरवानगी घ्यावी, असे प्रदेश भाजपचे धोरण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत युती सोडाच पूर्वपरवानगीची विचारणाही करू नये, अशा सूचना जिल्हा कार्यकारिणींना दिल्या आहेत. शिवसेनेने युती केली नाहीच तर भाजप जिल्ह्यात सर्व जागा स्वबळावर लढणार का? असे विचारले असता ‘तो निर्णय जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार घेतील’, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.देवतांचे पत्रक हा खोडसाळपणानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २००२ च्या परिपत्रकाचा आधार घेऊन एका कक्ष अधिकाऱ्याने हेतूपूर्वक पत्र बाहेर काढून खोडसाळपणा केला. ते शासनाचे परिपत्रक नव्हते. तरीही गैरसमज होऊ नये म्हणून राज्य शासनाने तातडीने अधिकृत परिपत्रक काढून खुलासा केला. त्यामुळे शिवसेनेने जे बाहेर पसरवले ते अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणुकीचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होता. तसे नसेल तर शिवसेनाही सत्तेत आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांनाच जाब विचारावा, असे आवाहन भंडारी यांनी केले. (प्रतिनिधी)नारायण राणेंचे ‘ईडी’ प्रकरण ही वस्तुस्थितीछगन भुजबळांनंतर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे ‘ईडीच्या रडारवर’ असे वृत्त महिनाभरात दुसऱ्यांदा पसरविण्यात आले आहे. त्याबाबत विचारले असता, निवडणुका लागल्या की, अशा बातम्या येतच असतात. भुजबळांशेजारी अनेक खोल्या रिकाम्या आहेत, असे मिश्कील उत्तर देत राणेंची चौकशी सुरू आहे, असे मी म्हणणार नाही आणि चौकशी सुरू नाही असेही नाही. मात्र, नारायण राणे यांचे ‘ईडी’ प्रकरण ही ‘वस्तुस्थिती’ आहे, असे भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.