शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोअर झोनमधील गावांचा निर्णय घ्या

By admin | Updated: October 21, 2015 21:40 IST

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : वन्यजीव मंडळाने अहवाल पाठवावा

पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये कोयना विभागातील येणारी १४ गावे वगळावीत, या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून याबाबत एक महिन्यात केंद्रीय वन्यजीव मंडळाने निर्णय घेऊन तसा अहवाल सीईसी समितीला पाठवून देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय वन्यजीव मंडळाने १४ गावे वगळावीत अशीच शिफारस केल्याने ती वगळल्यात जमा आहेत, अशी माहिती राजाभाऊ शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.कोअर झोनमधील १४ गावांना रस्ते, पाणी, शेती यासाठी अडचणी येत आहेत. या गावांची वस्तुस्थितीबाबत आमचे म्हणणे न्यायालयात सादर केले. तत्पूर्वी ५ आॅगस्ट १९९८ रोजी १४ गावे वगळण्याबाबत राठी कमिशनने आपला अहवाल राज्य शासनाकडे दिला होता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आपले म्हणणे पाठविले होते. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी कोयना अभयारण्य हद्द निश्चितीबाबत वन्यजीव विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. सर्व माहिती वन्यजीव विभाग व सीईसी कमिटीकडे पाठविण्यात आली. त्यापुढे सीईसीने १४ गावे वगळावीत अशाच शिफारशी दिल्यानंतर हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला. याबाबत नुकतीच सुनावणी होऊन न्यायालयाने याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचा आदेश दिला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)नवजा, मिरगाव कामरगाव, हुंबरळी, तोरणे, गोकुळ, घाटमाथा, वाजेगाव, दास्तान, चिरंबे, गोजेगाव, भारल, कुसवडे, आंबेघर अशी चौदा गावे वन कायद्यातील जाचक अटींतून सुटका झाल्याने आनंदी आहेत. याबाबत लवकरच अंतिम निर्णय हमखास मिळेल.- राजाभाऊ शेलार, अध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण समिती