शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी निवडीवेळी वाद

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

फोंडाघाट शिक्षण संस्था निवडणूक : चेअरमनपदी दत्तात्रय पवार तर सचिवपदी सुदन बांदिवडेकर

कणकवली : फोंडाघाट शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय पवार यांची चौथ्यांदा गुरुवारी निवड झाली आहे तर सचिवपदी सुदन बांदिवडेकर व खजिनदारपदी विठोबा तायशेटे यांची निवड झाली. दरम्यान, संचालकांच्या या निवडीवेळी वादही झाले. पाच सदस्यांनी आपले राजीनामे देत सभागृहातून जाणे पसंत केले तर उर्वरित दहा सदस्यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे फोंडाघाट शिक्षण संस्थेची निवडणूक यावेळीही दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी ठरली.फोंडाघाट शिक्षण संस्थेच्या यावर्षीच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. लढतीत दोन पॅनेलमधील काही उमेदवार गतनिवडणुकीपेक्षा अदलाबदली झाले होते. उत्कर्ष पॅनेलमधून सुदन बांदिवडेकर, रंजन नेरूरकर, शेखर लिंग्रस, सचिन तायशेटे, बबन हळदिवे, अभिजीत रेवडेकर, संदेश पटेल हे विजयी झाले तर प्रदीप पटेल, संजय सावंत, भाई सावंत, विशाल रेवडेकर, शामराव भोवड, दिलीप पारकर, अशोक सावंत, संतोष टक्के हे पराभूत झाले. परिवर्तन पॅनेलमधून दत्तात्रय पवार, राजन चिके, मनीष गांधी, हेमंत राणे, संजू आपटे, रमेश भोगटे, उदय मोदी, समीर मांगले हे विजयी झाले तर अविनाश सापळे, सुंदर पारकर, सुहास मोदी, मोहन सामंत, प्रसाद पावसकर, बाळा वळंजू, अभिनंदन डोर्ले हे पराभूत झाले. उत्कर्षचे सात तर परिवर्तनचे आठ संचालकपदी निवडून आले.संचालकांमधून चेअरमन व इतर निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात माजी चेअरमन प्र. रा. सावंत हे अनुपस्थित असल्याने सर्वानुमते राजन चिके यांची बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. परिवर्तन पॅनेलचे बहुमत होते. मात्र चेअरमन निवडीसाठी या पॅनेलचे संजू आपटे यांच्याबरोबर याच पॅनेलच्या दत्तात्रय पवार यांनीही चेअरमनपदासाठी इच्छा व्यक्त केली.बैठकीला उपस्थित दहा संचालकांमधून शेखर लिंग्रस यांची अध्यक्ष म्हणून निवड करून पुढील बैठक चालविण्यात आली. यात चेअरमनपदी दत्तात्रय पवार, सचिवपदी ुसुदन बांदिवडेकर व खजिनदारपदी सचिन तायशेटे यांची निवड करण्यात येवून तसा ठराव पुढे पाठविण्यात आला. याबाबत या प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी मोहन पारकर म्हणाले, १५ पैकी ५ जणांनी राजीनामे दिले. त्यामुळे दहा सदस्य सभागृहात उपस्थित असताना बैठक तहकूब कशी होणार? कोरम पूर्ण असताना अध्यक्षांनी व बैठक बोलावणाऱ्या सचिवांनी अजेंड्याप्रमाणे बैठक पुढे का केली नाही? अजेंड्यामध्ये राजीनामा, आयत्यावेळचे विषय असे मुद्दे नसताना सभाध्यक्षांनी राजीनामे कसे स्वीकारले? (प्रतिनिधी)पाच सदस्यांनी दिले राजीनामेदत्तात्रय पवार हे बंडखोरी करीत असल्याचा आरोप करीत संजू आपटे यांच्यासह पाच सदस्यांनी राजीनामे देत असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष राजन चिके हे देखील तेथून बाहेर पडले. यावेळी बैठकीच्या अजेंड्यावर राजीनामा हा विषय नसून ही बैठक पदाधिकारी निवडीची आहे. राजीनामे द्यायचे होते तर विद्यमान चेअरमन यांच्याकडे द्यायचे होते, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, माजी सचिवांनी ते राजीनामे स्वीकारले.