शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Updated: October 18, 2015 00:23 IST

महान येथील दुचाकी अपघातात गंभीर जखमी

मालवण : मालवण महान मार्गावर शुक्रवारी १६ आॅक्टोबरला झालेल्या मोटरसायकल अपघातातील गंभीर जखमी स्वामी कृष्णा चव्हाण (२३, रा. आंगणेवाडी) याचा शनिवारी सकाळी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वामी याच्या मृत्यूने आंगणेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी स्वामी हा आंगणेवाडी येथून मालवणच्या दिशेने येत असताना मालवण येथून आंगणेवाडी येथे जात असलेल्या दिनेश आंगणे या दोघात महान येथील अवघड वळणावर दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात स्वामी याच्या डोक्याला गभीर दुखापत झाली होती. दिनेश याच्याही हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. स्वामी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. दोघांवरही वैद्यकीय अधिकारी सुरेश पांचाळ व डॉ. अजित लिमये यांनी उपचार केले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. तर दिनेश याच्यावर कुडाळ येथे उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने स्वामी हा कोमात गेला होता. मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्वामी याचा आज सकाळी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपले शालेय व बारावीपर्यंत शिक्षण मालवण येथे पूर्ण करून तो नोकरी निमित्त मुंबईला गेला होता. काही दिवसापूर्वी कामानिमित तो मालवणला आला होता. त्याच्या मृत्यूनंतर व्यवसाय उभारणीचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. स्वामी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)