शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेने खेळाडू युवतीचा मृत्यू

By admin | Updated: December 9, 2015 01:14 IST

अमरावती विद्यापीठाच्या संघावर शोेककळा

रत्नागिरी : अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघातील दोन खेळाडू युवतींना भरधाव बसने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना सोमवारी रात्री ९.२0 च्या सुमारास घडली. दुसऱ्या जखमी युवतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पूजा विनायक आगरकर (वय १९, यवतमाळ) असे मृत युवतीचे नाव आहे. शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. सोमवारी रात्री अमरावती विद्यापीठाचे खेळाडू जेवणासाठी पोलीस मुख्यालयानजीकच्या खानावळीमध्ये गेले होते. जेवण आवरून विद्यार्थिनी परत येत होत्या. जेलनाका येथील मुख्य रस्ता ओलांडताना आंबेकोंड ते रत्नागिरी या बसने (एमएच-२०-बीएल-०७५१) त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसलेली पूजा विनायक आगरकर जागीच ठार झाली, तर तिची सहखेळाडू प्रियांका प्रकाश काळे (१९) ही जखमी झाली. दोघींनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. काही मिनिटांमध्ये या घटनेची माहिती शहर आणि परिसरामध्ये कळताच नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पूजा मृत झाल्याचे जाहीर केले नव्हते. रात्री उशिरा जमाव शांत झाल्यानंतर अखेर ही बाब जाहीर करण्यात आली. तुषार जगनराव अडसुळे (४२, अमरावती) यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी शहरी बसचे चालक प्रमोद मनोहर सावंत (५६, एस. व्ही. रोड, विश्वनगर, रत्नागिरी) यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. (वार्ताहर) पूजाचा मृतदेह यवतमाळकडे पूजा आणि प्रियांकाला बसने धडक दिल्यानंतर एकच गोंधळ झाला. या दोघींच्या मैत्रिणींना या अपघाताचा मोठा धक्का बसला. सर्वजण तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. उशिरापर्यंत सर्वजण रुग्णालयातच होते. आवश्यक सोपस्कार झाल्यानंतर रात्री उशिराने पूजा आगरकरचा मृतदेह ताब्यात देऊन यवतमाळकडे पाठविण्यात आला. कबड्डी स्पर्धेला स्थगिती या अपघातानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरील सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेला पूर्णत: स्थगिती देण्यात आली. चालक निलंबित या अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाला आमच्यासमोर हजर करा, अशी मागणी अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या लोकांनी केली. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जमाव शांत झाला. या अपघाताला जबाबदार धरून बसचे चालक प्रमोद मनोहर सावंत यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.