शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

डीबीजे महाविद्यालयात २८पासून जिल्हा ग्रंथोत्सव

By admin | Updated: January 23, 2015 23:36 IST

जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी विभागीय शासकीय ग्रंथालय रत्नागिरी व डीबीजे महाविद्यालय चिपळूण हे सहआयोजक आहेत

चिपळूण : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१४-१५ दि. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या संकुलात आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव समिती महोत्सवाचे आयोजक असून, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी विभागीय शासकीय ग्रंथालय रत्नागिरी व डीबीजे महाविद्यालय चिपळूण हे सहआयोजक आहेत. गंथ प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. २८ रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी निशिकांत जोशी, विजय चोरमारे, चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, अनिल तटकरे, रामनाथ मोते, विधान सभेचे सदस्य भास्कर जाधव, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुचय रेडीज, डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम जोशी, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रजेसिंह वसावे हे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता चिपळूणच्या स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक कलावंताचा सहभाग असणार आहे. गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता ‘सामाजिक चळवळ व साहित्यिकांची भूमिका’ यावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र दिवाडकर आहेत. सायंकाळी ४ वाजता साहित्यिक अरुण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार आहे. शुक्रवार दि. ३० रोजी सकाळी १० वाजता साहित्य जत्रा कार्यक्रमात साहित्यिक चर्चा व कवीसंमेलन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास बारटक्के असणार आहेत. ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी ४ वाजता प्राचार्य श्याम जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. परिसरात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर यांच्यासह प्रमुख प्रकाशक सहभागी होणार आहेत. ग्रंथोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)