शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी दणका

By admin | Updated: March 26, 2015 00:09 IST

वीज कोसळून सासोलीत एक जखमी : वैभववाडी, दोडामार्ग, फोंडाघाटात मुसळधार

वैभववाडी/दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यांत बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सासोली-हेदूस येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन नवसू धाऊसकर (वय ४०) यांच्यावर विजेचा लोळ कोसळून ते गंभीर जखमी झाले. जोराचा वारा आणि विजेच्या लखलखाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, केळी बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वैभववाडीसह फोंडाघाटातही दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. उष्म्याने अंगाची लाही होत असतानाच बुधवारी दुपारनंतर दोडामार्ग तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात दुकानदारांसह सर्वांचीच धावपळ झाली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील केळी बागायतींना फटका बसला. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर आपल्या घराशेजारील गोठ्यात काम करीत असताना विजेचा लोळ कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दोडामार्ग रुग्णालयात ाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावली. महिनाभरात तिसऱ्यांदा झालेल्या या पावसामुळे शिल्लक असलेल्या आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच भागात पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापारीवर्गासह नागरिकांची धांदल उडाली होती. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा झालेल्या या पावसामुळे शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी) बागायतदारांना मोठा फटकागेल्या आठवड्यात वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले होते. अखेर सायंकाळी ४.३० च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच मागील पावसात शिल्लक राहिलेल्या आंबा, काजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. फोंडाघाटात अर्धा तास पाऊसफोंडाघाट येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी कणकवली तालुक्यातील इतर भागात उष्णतेची तीव्रता तशीच टिकून आहे.