शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

दशावताराची परंपरा नवकलाकारांसाठी आव्हान

By admin | Updated: November 11, 2015 23:39 IST

जत्रोत्सवात वाढती मागणी : अभिनयाची लागणार कसोटी, त्रिपुरारी पौर्णिमेपासून गावागावात दहीकाला उत्सव

सुनील गोवेकर -- आरोंदा --सध्या जिल्ह्यात संयुक्त दशावताराला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. किंबहुना ही नाटके तुडुंब प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर होत असल्याने ‘संयुक्त दशावतार’ हा दशावतारातील नवा ट्रेंड बनला आहे. त्यातच संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगासाठी निमंत्रित केले जाणारे कलाकार हे जिल्ह्यातील नावाजलेले कलाकार असल्याने उच्चकोटीचा अभिनय पाहण्याची रसिकांना सवय लागून राहिली आहे. आता या महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील जत्रोत्सवांना प्रारंभ होणार असून, गावागावामधून होणाऱ्या या जत्रोत्सवात विविध दशावतारी नाट्यकंपन्यांचे कलाकार आपली दशावतारी कला सादर करणार आहे. यानिमित्ताने हे नव कलाकार संयुक्त दशावतारातून रसिकांच्या अभिनयासंबंधीच्या वाढलेल्या अपेक्षा कशा पूर्ण करणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.दशावतार ही कोकणची प्रमुख लोककला आहे आणि या कलेकडे आजही लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय चांगला आहे. जत्रोत्सवाबरोबरच वर्षभर चालणाऱ्या दशावतारी नाटकांना प्रेक्षकांची उपस्थिती कायमच मोठ्या प्रमाणात लाभत असते. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही पारंपरिक कला टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन कलाकार दशावताराकडे वळत आहेत. त्याचीच परिणिती म्हणून आज जिल्ह्यात अनेक छोट्यामोठ्या दशावतारी नाट्य कंपन्या कला जिवंत ठेवण्याबरोबरच व्यावसायिक दृष्टीकोनातूनही दशावताराकडे पाहात आहेत. मात्र, संयुक्त दशावतार ही संकल्पना सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या कलाकारांकडून अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे.संयुक्त दशावतार ही संकल्पना सुरू झाल्यानंतर ज्याठिकाणी हा नाट्यप्रयोग असेल, त्याठिकाणी लांबून प्रेक्षक हजेरी लावतात. या दशावतारी नाटकातील कलाकारांचे द्वंद्व मग ते प्रसंगावधान असो, पुराणातील ज्ञानातील असो किंवा बुद्धीचातुर्याचे असो, यामुळे प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन होते. संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगांमधून आतापर्यंत सुधीर कलिंगण, पुरूषोत्तम खेडेकर, हरिश्चंद्र गावकर, आनंद नार्वेकर, दादा राणे (क ोनसकर), उदय राणे (कोनसकर), राधाकृष्ण नाईक, भरत नाईक, दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, संतोष रेडकर, राजू हर्याण, विठ्ठल गावकर, चारूहास मांजरेकर, प्रशांत मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण, सुधीर तांडेल, पप्पू नांदोसकर या व अशा इतर प्रतिभावान कलाकारांनी लोकांना दशावताराकडे खेचून आणले आहे. पुराणातील ज्ञान, बुद्धिचातुर्य, प्रसंगावधान या महत्त्वाच्या असणाऱ्या आघाड्यांवर हे कलाकार परिपक्व असल्याचे दिसून येते.कला सादर करणाऱ्यांसाठी लागणार कसआता जत्रोत्सवांमध्ये दशावतारी कला सादर करणाऱ्या कलाकारांचा खरा कस लागणार आहे. कारण आजचा प्रेक्षक हा कौशल्यपूर्ण अभिनयाची आस असणारा आहे. त्यामुळे दशावताराचा बदलता ट्रेंड नव कलाकार कसे टिकवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करून प्रेक्षकांना जागेवर बसवून ठेवणारा अभिनय त्यांना करावा लागणार, हे नक्की!