शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्यालाच ‘हापूस’ बाजारात दाखल

By admin | Updated: October 27, 2015 00:10 IST

उदय नरवणकर : ४०० पैकी केवळ एकाच झाडाला १०० आंबे

दापोली : फळांचा राजा हापूस आंब्याने यंदा आपल्या आगमनाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यंदा तो दिवाळीत नव्हे; तर चक्क दसऱ्याच्या दिवशी बाजारात दाखल झाला आहे. हर्णै येथील प्रगतशील आंबा बागायतदार उदय नरवणकर यांच्या आंब्याच्या झाडावर शंभरपेक्षा अधिक आंबे लगडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्या परसदारातील आंब्याच्या झाडाने आगमनाचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा आनंद नरवणकर यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या वर्षीपासून पुढे जोपर्यंत नवरात्रोत्सवात आंबा बाजारात येत नाही तोपर्यंत हा विक्रम त्यांच्या नावावर अबाधित राहणार आहे. याबाबत बोलताना उदय नरवणकर म्हणाले की, याच वर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या बागेतील आंब्याच्या झाडावर आंबे होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही मिनिटांकरिताच एक वादळ आले. यात आपल्या घराच्या दारातील आंब्याच्या झाडाची फांदी तुटली. जुलै महिन्यात दापोलीत कडकडीत ऊन पडले होते.त्यानंतर या आंब्याच्या झाडाला चांगलाच मोहोर आला. शिवाय नंतर आलेल्या पावसात तो टिकलादेखील! नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या काही दिवस आधी आपण केवळ तुडतुड्यांकरिता औषधाची फवारणी केली. मात्र, कल्टार किंंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपण या आंब्यावर फवारणी केलेली नाही. त्यांनी ५५ आंबे काढले आहेत. त्यांच्या मालकीची आंब्याच्या ४०० झाडांची बाग आहे. मात्र, यापैकी कोणत्याही झाडावर अजून फळधारणा झालेली नाही. केवळ त्यांच्या दारातील आंब्यावर सुमारे १०० फळे आल्याने आश्चर्य व्यक्तत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)वेळेच्या आधी आलेला आंबा आपल्याला चांगला भाव देईल, असे त्यांना अनेकांनी सांगितले. मात्र, या आंब्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त उत्पन्नाची आस नसल्याचे ते सांगतात. याकरिता आपण स्वत: गाडी करून हे आंबे वाशी मार्केटला नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरवणकर यांच्या नावाचा बॅ्रन्ड यापूर्वीच वाशी मार्केटमध्ये गाजत तयार आहे. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून हा व्यवसाय ते करत आहेत. यावर्षी केवळ आपल्या गावाबरोबर दापोलीच्या नावावरही या विक्रमाचा शिक्का लागायला हवा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे.