शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

By admin | Updated: February 9, 2015 01:22 IST

रत्नागिरी नगरपालिका : फेबु्रवारीअखेर धरणातील पाणीसाठा संपणार

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीअखेर पुरेल. त्यानंतर शीळ धरणातूनच शहराला लागणारे पाणी पूर्णत: घ्यावे लागणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासूनची ही स्थिती आहे. गाळाने भरलेल्या व खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा दरवर्षी ठणाणा करणाऱ्या राजकीय पक्षांकडून नव्याने धरण उभारण्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने नाजूक स्थितीत असलेले हे धरण केव्हा कोसळेल, याचा नेम नसल्याच्या प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे धरण हातखंब्याजवळ असून ते सर्वाधिक जुने धरण आहे. या धरणावरून नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून रत्नागिरीपर्यंत पाणी आणले जाते. त्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही. रत्नागिरीची लोकसंख्या सहा दशकांपूर्वी खूप कमी होती. तरीही त्यावेळच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत पानवल येथे रत्नागिरी पालिकेसाठी जागा घेतली. तेथील नदीवर धरण बांधले गेले. या धरणातून रत्नागिरी शहराला दररोज दीड ते दोन दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणातून पावणेदोन एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला केला जात आहे. मात्र, विजेचा लाखो रुपयांचा खर्च वाचविणाऱ्या या धरणाकडे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी पालिकेत येणाऱ्या कोणत्याही कारभाऱ्यांकडून गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. सहा वर्षांपूर्वी या धरणातील गाळ उपसा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. उपसा केलेला गाळ धरण पात्राच्या कडेलाच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा तो गाळ धरणात गेला. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला.धरणाची सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. हे धरण पायथ्याला खचलेले असून, केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने धरणाची स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. हे धरण दुरुस्त केल्यास शहराला मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल व लाखो रुपयांचे वीजबिलही वाचेल. परंतु या धरणाकडे दुर्लक्ष करीत शीळ धरणातील पाणी खेचण्याकडेच पालिकेतील कारभाऱ्यांचा अधिक कल असतो. शीळच्या पाण्यासाठी दर महिन्याला २० लाखांपर्यंत वीजबिल मोजावे लागते. हे वीजबिल कमी करायचे असेल, तर पानवल धरण नव्याने उभारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.