शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

...तर दाभोळ खाडी बनेल रोजगाराचं केंद्र

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी : बोटिंगसह विविध प्राणी, पक्षी व मगरी पाहण्याचा अनोखा योग

सुभाष कदम - चिपळूण -‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग गो चेडवा दिसता कसो कोकणचो थाट...’ हिरवी शाल पांघरलेला महेंद्र पर्वत, त्याच्या मध्यावरुन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग व त्याला भेदून गेलेला कोकण रेल्वेचा मार्ग, त्याखाली पायथ्याशी असणारी दुथडी भरुन वाहणारी वाशिष्ठीची दाभोळ खाडी हा परिसर म्हणजे पर्यटकांना पर्वणी असते. सर्वसामान्य लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या दाभोळ खाडीतील या सौंदर्याचा प्रसार झाला तर त्यातून इथं पर्यटकांची गर्दी वाढेल आणि त्यातून रोजगाराचं मोठं दालन खुलं होईल.दाभोळ खाडीची विहंगम दृश्य पाहण्यासाठी बोटीतून सफर करायला हवी. खेड, गुहागर आणि चिपळूण या तीन तालुक्यांच्या मध्यावर हे खाडीपात्र विसावले आहे. खाडीकिनारी असणारी उंचच उंच नारळी पोफळीची झाडे, हापूस आंब्याच्या बागा, झुडपाझुडपाने दिसणारी काजूची झाडे याबरोबरच रानटी वेलींनी करकचून आवळलेले जंगल त्यावर फुललेली रंगीबेरंगी फुले पाहताना मन भारावून जाते. दाभोळ खाडीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. या खाडीच्या एका बाजूला गोविंदगड किल्ला आहे. गोवळकोटचा गोविंदगड आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. लगतच सवतसडा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आता हा धबधबा कोरडा असतो. परशुराम मंदिराच्या पायथ्याशी धामणदिवी हे हिरवाईने नटलेले गाव वसले आहे. या गावातून कोकण रेल्वेचा बोगदा आहे. पर्यटनदृष्ट्या या गावात प्रवेश केला तर नजरेसमोर दाभोळखाडी व गोविंदगडचे अनोखे दर्शन घडते. पावसाळ्यात रौद्ररुप धारण केलेली दाभोळ खाडी लाल भडक पाण्याने तुडुंब भरुन वाहात असते. मुसळधार पावसातही खाडीचे हे तामसी रुप लक्ष वेधते. आता हिवाळा सुरु असताना खाडीचे हिरवेकंच पाणी, त्यात किनाऱ्यावर असलेली झाडेझुडपे व विविध जातीचे पक्षी मुक्तपणे विहंगम करताना आढळतात. विविध आकाराच्या अनेक लहान- मोठ्या मगरी, बगळे, बदक व उद नावाचा प्राणी या खाडीत स्वच्छंद विहार करीत असतात. पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असते. या काळात दाभोळ खाडीची सफर म्हणजे वातावरणातील गारव्याप्रमाणे मन समाधानी करणारे ठरते. हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं दुर्मीळ झाली आहेत. वेळ नाही, पैसे नाहीत, अशा तक्रारींचा पाढा वाचणारी माणसेही दाभोळ खाडीत येऊन हरखून जातात. सूर्योदय आणि सूर्यास्त या काळात खाडीतून भ्रमंती करताना आपण वेगळ्याच विश्वात असल्याचा भास होतो. सूर्योदयाच्या काळात पूर्वेकडून येणारी सोनेरी किरणे अंगावर झेलताना अंग अंग मोहरुन जाते, तर सायंकाळच्या वेळी पश्चिमेकडे समुद्रात डुबणाऱ्या सूर्याचा लाल गोळा पाहताना विलक्षण आनंद होतो.परशुराम विसावा पॉर्इंट येथून संपूर्ण खाडीचे व परिसराचे दर्शन होते. दाभोळ खाडीतून फिरताना परिसरात असणाऱ्या गावातील संस्कृती आणि रुढी, परंपरा पाहण्याचा, तेथील ग्रामीण जीवन अनुभवण्याचा व अभ्यासण्याचा एक योग पर्यटकांना मिळतो. यासाठी एकदा दाभोळ खाडीची भ्रमंती करायलाच हवी. शहरातील झपाट्याने उभी राहणारी सिमेंटची जंगले, औद्योगिकीकरणामुळे होणारा यंत्रांचा खडखड, वाहनांच्या वर्दळीमुळे गोंगाट करणारे आवाज, होणारे ध्वनी प्रदूषण यावर मात करण्यासाठी एखाद दिवस दाभोळ खाडी परिसरात स्वच्छंद विहार करुन मन ताजेतवाने करण्याची संधी इथला निसर्ग पूर्णपणे देतो.गोवळकोट धक्का येथून दाभोळ खाडीच्या प्रवासाला सुरुवात केली की, समोर धामणदिवी, बहिरवली, सोनगाव, जुवाड, मजरेकाशी, कालुस्तेकडे जाणारा पूल, करंजीकर मोहल्ला, चिवेली, बामणोली, दोणवली, केतकी, करंबवणे हा सारा परिसर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. नितळ वाहणारी वाशिष्ठी औद्योगिकीकरणामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे मासे मर्तुकीसारख्या घटना सातत्याने घडत असतात. या किनारपट्टी भागात मच्छिमारीवर उपजीविका करणारा भोई, मच्छिमार व दाल्दी समाज अडचणीत आला आहे. त्यांच्या रोजीरोटीबरोबरच पिण्याचे पाणीही दूषित झाले आहे. माशाच्या दुर्मीळ जाती आता लोप पावल्या आहेत. विशेषकरुन किनारपट्टी भागात मिळणारी कोळंबी नष्ट झाली आहे. परिसरातील वाळू उत्खननामुळेही जलचरांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक जलचर प्राणी, पक्षी या भागातून नष्ट झाले आहेत. सध्या मगरी कमालीच्या वाढल्याने या भागाला क्रोकोडाईल पार्क असे संबोधले जाते. त्यामुळे मगरी पाहण्याचा आनंद यातून मिळतो. व्यापारातही बोलबालापूर्वी दाभोळ खाडीत गोवळकोट धक्क्यावर मोठ्या प्रमाणावर व्यापार चाले. पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे घाटावरुन कुंभार्लीमार्गे बैलगाडीने माल गोवळकोट बंदरावर आणला जात असे. तेथून तो गलबताने किंवा जहाजाने तो राज्याच्या इतर कानाकोपऱ्यात किंवा परदेशात पाठविला जात असे. इतर राज्यातून मंगलोरी कौले किंवा इतर सामान येथे येत असे. बंदरात ते उतरविले जात असे. जलवाहतुकीसाठीही गोवळकोट धक्का प्रसिद्ध होता. पूर्वी बाहेरुन येणाऱ्या बोटी किंवा लाँच गोवळकोट येथे थांबत असत. तेथून मुंबईकडे सहज जाता येत असे. या बोटी भाऊचा धक्का येथे लागत असत. त्यामुळे मुुंबईहून गावी येण्यासाठी अतिशय सोयीचा व कमी खर्चिक असा हा प्रवास होता. परंतु, काळ बदलला खाडी होरली आणि ही जलवाहतूक कायमची विस्मृतीत गेली. आता ही वाहतूक कालबाह्य झाली आहे. पाहण्यासारखं बरंच काही...दाभोळ खाडी विक एण्डला येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत सोयीची असल्याची जनजागृती करायला हवी. या भागातील मगरी, जलचर, परिसराती विहंगम दृश्य, बोटीची सफारी याची जनजागृती झाल्यास एक ते दोन दिवसांसाठी पर्यटकांना येथे खिळवून ठेवता येईल. निसर्ग सौदर्याबरोबरच भगवान परशुराम मंदिर, बामणोलीचा मठ, धामणदिवीचे पिंपळेश्वर दत्त मंदिर, दर्गा, गोंधळे येथील पांडवकालीन शिव मंदिर व परिसरातील इतर लहान मोठी मंदिरे ही धार्मिक स्थळेही पर्यटकांना पाहता येतील. गोविंद गडावर भ्रमंती करुन करंजेश्वरीचे दर्शन घेता येईल. येथे येण्यासाठी...मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण एस. टी. स्टॅण्ड येथून येथे जाता येते. कोकण रेल्वेने आल्यास चिपळूण स्टेशनपासून रिक्षाने येथे सहज जाता येते. गुहागरकडून वेलदूर येथून दाभोळ खाडीत जाता येते. दाभोळ धक्क्यावरुन किंवा बहिरवली खेड खाडीपट्ट्यातून येथे येता येते. लोटे औद्योगिक वसाहतीतून सोनगावमार्गे जाता येईल. मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वेने येथे जाण्यासाठी सहज सोयी उपलब्ध असल्याने राज्याच्या कोणत्याही भागातून एक ते दोन दिवसांसाठी येथे पर्यटनासाठी येणे सोयीचे होईल. चिपळूण येथे निवास व न्याहरीची उत्तम व्यवस्था आहे.