शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायकल सफरीतून विद्यार्थ्यांचा आनंद दुणावला!

By admin | Updated: February 18, 2015 23:50 IST

निसर्ग फेरी : रत्नागिरी-हेदवी-रत्नागिरी फेरीत गुरुकुलचे विद्यार्थी...

रत्नागिरी : वैज्ञानिक युगातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेतील अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलतर्फे विद्यार्थ्यांनी रत्नागिरी - हेदवी - रत्नागिरी अशी सायकल सहल पूर्ण केली.गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रघुवीर भिडे यांच्याहस्ते व पालकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून सायकल सहलीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आरे-वारेमार्गे गणपतीपुळे हा प्रवास सकाळ सत्रात यशस्वीपणे पूर्ण केला. प्रवासात विद्यार्थ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीचे वन, छोट्या लाँच बांधणीचे कारखाने, केशवसूत स्मारक यांची माहिती घेतली. जयगड येथे झगडे यांच्या घरी दुपारी भोजन करुन पुढील हेदवी चिंद्रवलेपर्यंतचा प्रवास सायंकाळी ७.३० वाजता पूर्ण केला. त्या ठिकाणची निवास व भोजनाची व्यवस्था रमेश सुर्वे यांनी उत्तमरित्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरु केला. दोडवली, मासू, भातगावमार्गे रत्नागिरी असा प्रवास पूर्ण केला. दुपारच्या भोजनाची व्यवस्था संतोष सावरकर यांनी केली. गुरुकुलच्या ३० विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी सहलीत सहभागी झाल्या होत्या. सहल यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शिक्षक किरण सनगरे, गौरव पिळणकर, देवराम दळवी, प्रेमचंद तेंडुलकर यांनी विशेष प्रयत्न केले. यासोबत पालक रमेश सुर्वे, संतोष सावरकर, दत्ताराम मुंडेकर यांचे सहकार्य लाभले. गुरुकुल व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुवीर भिडे, गुरुकुलप्रमुख राजेश आयरे व र. ए. सोसायटीच्या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)दोन दिवसांची सायकल सहल.गुरुकुलच्या ३८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.वद्यार्थ्यांसह पालकांचेही सहकार्य.पालकांच्या उपस्थितीत सायकलफेरीचे उद्घाटन.