शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल

By admin | Updated: August 16, 2016 23:47 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरीत ‘सायबर सेल’चे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली. संवादाचा वेग वाढला. फेसबुक, वॉट्सअ‍ॅप, व्टीटर, ब्लॉग, अशी अनेक माध्यमे जनमाणसांत चांगलीच रुजली आहेत. तथापि, यांचा गैरवापरही होऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ३२ ठिकाणी एकाचवेळी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ‘सायबर सेल’ स्थापन होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल. जनतेने या सेलकडे आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सायबर सेलचा प्रभावीपणे वापर करून सायबर क्राईम अंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नव्याने सरू करण्यात आलेल्या सायबर सेलचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात जिल्हा पोलिसप्रमुख अमोघ गावकर यांनी सायबर सेलच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते यांनी केले. समारंभास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता निर्मले, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तसेच पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण प्रकल्प राबविणारजनतेच्या रक्षणाबरोबरच तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला सौजन्यपूर्ण वागणूक देणे ही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पोलिस दलात काम करणारे हात आणि त्यांचे मन मजबूत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्याचाही विभागाकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. कर्तव्य भावनेने अविश्रांत कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची चांगली सुविधा मिळावी, यासाठी गृह विभागामार्फत पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वसाहतीचे नूतनीकरण, कायमस्वरूपी वास्तव्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प, आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.