शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक मारहाण प्रकरणावर पडदा

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

फोंडाघाटमधील प्रकरण : दोन्ही बाजूंनी परस्पर दिलगिरी व्यक्त

ओरोस : फोंडाघाट येथील रिक्षाचालक जयेश मोंडकर यांना सहायक मोटार वाहन निरीक्षकांकडून झालेल्या मारहाण प्रकरणावर दोन्ही बाजूंकडून परस्पर दिलगिरी व्यक्त करीत पडदा टाकण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक उदय पाटील यांनी आज, बुधवारी जिल्हा दौऱ्यावर असता फोंडाघाट येथे हरकुळ खुर्द येथील रिक्षाचालक जयेश मोंडकर यांना रिक्षाची कागदपत्रे नसल्याने ८ हजार रूपये दंडाचा मेमो दिला होता. मात्र त्यानंतर पाटील यांनी आपल्याला मारहाण केली, असे जयेश मोंडकर यांनी अन्य रिक्षाचालकांना सांगितले होते. फोंडाघाट येथील रिक्षा चालक-मालक यांनी ओरोस येथे येऊन आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते. यावेळी उदय पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर त्या दिवशी उपस्थित नसल्याने याप्रकरणी सोमवारी एकत्र बसून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.दरम्यान, फोंडाघाट रिक्षा चालक-मालक ओरोस आरटीओ कार्यालयात दाखल झाले. किरण बीडकर यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत सहायक मोटार वाहन निरीक्षक उदय पाटील यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी रिक्षाचालक जयेश मोंडकर यांच्याकडे रिक्षांचे कागदपत्र नव्हते. त्यानंतर त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी जबरदस्तीने रिक्षा काढण्याचा प्रयत्न केला. तेथून जात असताना आपल्या रिक्षाचा धक्का लागला. तसेच एक चाकही पायावरून गेले. त्यावेळी पायाला दुखापत झाली. त्यामुळे पुढे जाऊन त्याला अडवले. यावेळी मोंडकर यांनी पळण्याचा प्रयत्न केल्याने कदाचित अनावधानाने आपल्याकडून हात उगारला गेला, असे पाटील यांनी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. तर मोंडकर यांनीही आपल्याकडे कागदपत्र नव्हते, त्यामुळे आपल्याकडूनही चूक झाली, असे सांगितले. त्यामुळे आपापसातील दोन्ही बाजूच्या चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे परस्परांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांच्यासमोर ही चर्चा केली गेली. यावेळी फोंडाघाट रिक्षाचालक, मालक व अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)