शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

मोडयात्रेलाही भाविकांची तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:45 IST

मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रोत्सवाची रविवारी सायंकाळी उशिरा मोडयात्रेने उत्साहात सांगता झाली. भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सलग सुट्यांमुळे भाविकांनी गर्दीचा उच्चांक मोडीत काढत विक्रमी गर्दी केली. शनिवारी सायंकाळनंतर उसळलेला भाविकांचा जनसागर रविवारी पहाटेपर्यंत कायम होता.रविवारी सकाळच्या सत्रात गर्दी ओसरल्याचे चित्र असतानाच दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांच्या ...

मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रोत्सवाची रविवारी सायंकाळी उशिरा मोडयात्रेने उत्साहात सांगता झाली. भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सलग सुट्यांमुळे भाविकांनी गर्दीचा उच्चांक मोडीत काढत विक्रमी गर्दी केली. शनिवारी सायंकाळनंतर उसळलेला भाविकांचा जनसागर रविवारी पहाटेपर्यंत कायम होता.रविवारी सकाळच्या सत्रात गर्दी ओसरल्याचे चित्र असतानाच दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी चारनंतर मोडयात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी उशिरा मोडयात्रेने कोकणच्या या महाउत्सवाची सांगता झाली.आंगणेवाडी यात्रा ही दीड दिवसाची असते. पहिल्या दिवशी शनिवारी पहाटेपासूनच भाविकांसाठी नऊ रांगांतून दर्शन सुरू होते, तर रात्री नऊ वाजल्यापासून देवीला प्रसाद लावण्याचा सोहळा भाविकांनी नयनांत साठवून ठेवला. देवीच्या प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली.यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळपासून भाविकांच्या दर्शनाच्या रांगा भरलेल्या होत्या. मोडयात्रेच्या शेवटच्या टप्प्यातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले.आंगणेवाडी यात्रोत्सव शेकडो दुकानांच्या साक्षीने उजळून गेला होता. मंदिर परिसरात करण्यात आलेली लक्षवेधक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. यावर्षीही लेसर किरणांचा वापर करण्यात आला होता.लेसर किरण व ड्रोन प्रणाली लाखो भाविकांचे आकर्षण ठरले. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने तसेच मनोरंजनात्मक प्रकारांना मोठा प्रतिसाद लाभला. तसेच शूटिंगबॉल स्पर्धेलाही क्रीडाप्रेमींचाउत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. आंगणेवाडीग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून दीड दिवसाचा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पडला.आंगणे कुटुंबाने घेतले दर्शनभाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय नियोजनात व्यस्त असतात. त्यामुळे मोडयात्रेच्या दिवशी आंगणे कुटुंबीय मातेचे दर्शन घेतात; मात्र यावर्षी सलग सुट्ट्यांमुळे आंगणे कुटुंबीयांनी रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुटुंबीयांसह दर्शन घेतले नव्हते. सायंकाळी भाविकांची गर्दी ओसरल्यानंतर आंगणे कुटुंबीयांनी रांगेत उभे राहून भराडी देवीचे दर्शन घेतले. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस, महसूल, आरोग्य, वीज, आदी प्रशासकीय यंत्रणा तसेच आंगणे कुटुंबीय मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ तसेच आंगणे परिवाराने परिश्रम घेतले.