शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

करुळ घाटात साईडपट्टीला भगदाड

By admin | Updated: July 14, 2016 00:30 IST

दरड कोसळलेल्याचा परिणाम : बॅरल ठेवून धोकादायक भाग बंदिस्त

वैभववाडी : करुळ घाटात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी बॅरल लावून सार्वजनिक बांधकामने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. सलग चार दिवस धो-धो कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे तिथवलीत गोठा जमीनदोस्त झाला असून मंगळवारी तालुक्यात सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. सोमवारी वैभववाडी तालुक्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने करुळ घाटात दरड कोसळली होती. ती दरड तब्बल चौदा तासांनी हटविली. मात्र, कोसळेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हे भगदाड वाढून रस्त्याचा पृष्ठभाग खचण्याची शक्यता आहे. खचलेल्या साईडपट्टीमुळे वाहतूकीला बाधा होऊ नये, यासाठी खचलेल्या साईडपट्टीभोवती बॅरल लावून तो भाग बंदीस्त केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीस तेथे वाहतुकीला धोका कमी असला तरी भगदाड भरुन न घेतल्यास पावसामुळे येथील भाग आणखी खचून भगदाड वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारच्या पावसाची १५५ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून या पावसामुळे तालुक्याच्या विविध भागात घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे. तिथवली येथील अनंत रोगये याचा गोठा जमीनदोस्त झाला असून त्यांचे सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच अशोक तांबे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे फुटले. त्याचप्रमाणे सुनील हरयाण यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नाधवडेतील यांच्या घराच्या पडवीवर झाड पडल्यामुळे दोन हजारांचे नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला. मात्र, पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग सोमवारपासून बंद असल्याने आठवडा बाजारात भाजी विक्रेत्यांची संख्या कमी होती. त्यामुळे आठवडा बाजारातील भाजीचे दर वाढले होते. या दरवाढीचा फटका बाजाराला आलेल्या ग्राहकांना बसला.(प्रतिनिधी)