शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यात मगरीची पिल्ले आढळली

By admin | Updated: May 31, 2014 01:14 IST

मगरींचा नदीच्या तीरावरील वावर वाढला

 बांदा : तेरेखोल नदीपात्रातील मगरींची संख्या वाढत असून मगरींचा नदीच्या तीरावरील वावर वाढला आहे. काल सायंकाळी भलीमोठी मगर बांद्यात नदीच्या तीरावर आढळून आली होती. आज शुक्रवारी सकाळी बांद्यातील काही युवकांना मगरीची पिल्ले पाण्याबाहेर आलेली आढळली. नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने उथळ नदीपात्रातून ये -जा करणार्‍या लोकांसाठी तसेच पाळीव जनावरांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी सायंकाळी नदीपात्रालगत भलीमोठी मगर विसावली होती. यावेळी मगरीला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र, चाहूल लागल्याने या मगरीने नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि शुक्रवारी सकाळी बांद्यातील युवक बाबलो धामापूरकर, राज हरमलकर, ऋषिकेश हरमलकर यांना याच परिसरात मगरीची सुमारे दहा ते पंधरा पिल्ले आढळली. त्यापैकी तीन पिल्ले पाण्याबाहेर नदी काठावर फिरत होती. या पिल्लांपासून कोणाला धोका होऊ नये, यासाठी या युवकांनी या पिल्लांना जाळीत पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले. त्यानंतर या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळयात पुराच्या पाण्याबरोबरच मगरींची पिल्ले वाहत बांदा शहरात भरवस्तीत आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वनखाते मगरींचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत आहे. नदीपात्रात लोकांचा वावर असल्याने या मगरींपासून जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासाठी वनखात्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)