शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 19, 2014 23:29 IST

हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी त्या गुन्ह्यांचा उलगडाही त्याच प्रमाणात सुरू आहे. बंद बंगले तसेच शाळा फोडणारी टोळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने या टोळीला आळा कसा घालायचा हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. या टोळीतील काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.सावंतवाडीत आॅगस्टमध्ये घडलेल्या बहुचर्चित वासनाकांडाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जप्त करण्यात आलेल्या बोलेरो गाड्या हाही चर्चेचा विषय ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि अवैध दारू वाहतूक सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात ना पोलीस विभागाला यश आले, ना उत्पादन शुल्क विभागाला. राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत आणि तेही खाकीच्या आशीर्वादानेच.हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.जिल्ह्यात शाळा फोडणारी टोळी कार्यरत होती. त्या टोळीतील एका युवकाला आंबोली येथे पकडण्यात आल्यानंतर संपूर्ण टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सावंतवाडीतील चराठा भागात बंद बंगले फोडणाऱ्या युवकालाही पोलिसांनी जेरबंद करून चोऱ्यांवर नियंत्रण मिळवले. लाचलुचपत विभागानेही चांगली कामगिरी केली असून अनेक लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तसेच बंद घरे फोडणारी टोळी कार्यरत होती. या टोळीला आंबोली पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे पकडण्यात यश आले. यामध्ये पाचजणांचा समावेश होता. तर मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यालाही पोलिसांनी पकडले. एकाच कुटुंबातील पाच ठारजिल्ह्यात यावर्षी अपघातांचे प्रमाण वाढले. झाराप-पत्रादेवी महामार्गावर छोट्या-मोठ्या गाड्यांचे अपघात झाले. यात गुजरात येथील कारला मळगाव येथे झालेला अपघात धक्कादायक होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच मृत झाले. तर नांदगाव, आंबोली येथील अपघातही फारच धक्कादायक होते. अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत. याशिवाय जिल्ह्यात आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. गोव्यातील दोन तरुणांनी सावंतवाडीत आत्महत्या केली होती. अनंत जाधव