शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहा अपंगांनी एकत्र येत गट तयार करा

By admin | Updated: March 30, 2016 23:45 IST

काळसे येथे मेळावा : ग्रामपंचायतीच्यावतीने अपंगांना टेबल फॅनचे वाटप

चौके : अपंग मुलांच्या पाठिशी त्यांच्या पालकांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. अपंगाने स्वत: पुढे आल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. अपंग सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. कमीत कमी १० अपंगांनी एकत्र येऊन गट तयार करा. शासन तुमच्याकडे येणार नाही तर तुम्ही तिथपर्यंत जाऊन शासनाच्या विविध योजना समजावून घेऊन त्यांचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता स्वत: निर्माण करायची आहे, असे आवाहन अपंग बांधवांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब पाटील यांनी केले.ग्रामपंचायत काळसे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्यावतीने रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परबवाडा काळसे नं. १ येथे अपंग बांधवांचा मेळावा घेण्यात आला. हा अपंग मेळावा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यावेळी व्यासपीठावर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती उदय परब, राजेंद्र परब, काळसे सरपंच भावना मेस्त्री, युनियन बँक कुडाळचे शाखा प्रबंधक संदीप घुले, उपशाखा प्रबंधक विजय तुळसकर, पन्हाळा तालुका अपंग सेलचे अध्यक्ष अरुण पाटील, काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, पॅराडाईज फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष विनय सावंत, उपसरपंच चंद्रकांत दळवी, व्ही. डी. प्रभू, एम. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यास पंचक्रोशीतील अपंग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)