शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

घरासमोरील ‘अंगण’ झाले चिरेबंदी

By admin | Updated: April 2, 2016 00:18 IST

पारंपरिकता होतेय लुप्त : झावळी, मांडव होत आहेत गायब; खेळणेही बंद

निकेत पावसकर -- नांदगाव --मोठमोठ्या शहरांमुळे ग्रामीण भागाचेही झपाट्याने आधुनिकीकरण होत असले तरीदेखील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अंगण आणि त्यावर असलेला मांडव (मंडप) ही कोकणातील संस्कृती काही ठिकाणी जपलेली दिसून येते. अलीकडे अत्यंत वेगाने होत असलेल्या बदलामुळे अनेक रूढी-परंपरा मागे पडत आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोकणातील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अंगण आणि त्यावर असलेला मांडव म्हणजे स्वर्गसुख अलीकडे दुर्मीळ झालेला दिसतो. अनेकांच्या घरासमोरील अंगण हे चिरेबंदी बांधलेले असल्याने त्यातील मजा आणि पारंपरिकता लुप्त होत चालली आहे.कोकणातील अनेक रूढी-परंपरा या जिवापाड जपल्या जातात. वयोवृद्ध माणसे पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपत असतात. जसजशी प्रगती होत चालली, तसतशी कोकणातील घरे बदलली. विशेषत: कौलारू घरासमोरील असलेले अंगण आणि मांडव यात बदल झालेला दिसून येतो. अलीकडील काही वर्षांपर्यंत अनेक घरांसमोर सारवण केलेले अंगण आणि त्यावर मांडव घातलेला दिसून यायचा. मात्र, त्यात सध्या बदल होऊन सारवण केलेल्या अंगणाची जागा चिरेबंदी बांधलेल्या अंगणाने घेतली.पारंपरिक अंगणावर सावलीसाठी माडाच्या झावळी किंवा गवताचा वापर केला जायचा. अंगण गावातील काही खास माणसांकडून करून घेतले जायचे. अंगण झाले की त्यावर घरातील महिला सारवण करून घ्यायचे. त्यावर चारही बाजूला मेडके उभे करून बांबूचे वासे टाकून वरती सावळी केली जायची. काही वर्षांपूर्वी सावलीसाठी वापरण्यात येणाऱ्या झावळी किंवा गवताची जागा सध्या कापड व पत्र्यांनी घेतलेली दिसते. अलीकडे मांडवदेखील कायमस्वरूपी बांधकाम करून उभारून त्यावर सिमेंट किंवा आधुनिक पत्रे टाकून उभारला जात असल्याचे सर्रास दिसून येते. गावतील कौलारू घरांच्या सौंदर्यात अधिक भर पडायची ती उन्हाळ्यात गवताच्या मंडपाने अनेकजण याच थंडगार मंडपात दुपारची झोप घ्यायचे. सायंकाळी याच मंडपाच्या मेडींना पकडून खेळायचे; पण आज मंडपही लोखंडी व पत्र्याच्या छप्पराचे झाले. दुपारची झोप गायब झाली आणि सायंकाळचे खेळणेही बंद पडले. जमिनीचे सारवण करून व सावलीसाठी टाकलेल्या गवत असलेल्या अंगणातील मजा अलीकडेच्या अंगणात मिळत नाही. थंडीच्या दिवसांत स्वच्छ चांदण्यामध्ये गप्पा मारत बसण्याचा अल्हाददायक क्षण मात्र हिरावून घेतल्यासारखे झाले आहे. थंडीच्या दिवसात स्वच्छ चांदण्यामध्ये गप्पा मारत बसण्याची मजा आणि आनंद काही औरच असतो. थंडी संपल्यानंतर ज्यावेळी कडक उन्हाळा सुरू होतो, तेव्हा अंगणात झोपण्याची मजाही अनुभवता येते. या मांडवात घरच्या महिलांनी काढलेली अत्यंत सुंदर रांगोळीही अनेकांचे लक्ष वेधून घेते. पूर्वापार चालत आलेली ही अंगण आणि मांडवाची संस्कृती आजही कोकणात काही ठिकाणी पाहावयास मिळते.‘ते’ प्रसंग आणि अनुभवअनेक प्रकारचे धार्मिक प्रसंग विशेषत: कोकणातील विवाह सोहळे याच मांडवामध्ये करण्याची प्रथा आजही सुरू आहे. एखादा विवाह सोहळा अशा अंगणात स्वत:च्या घरी होणे हा अनेकांसाठी अलौकीक आनंद असतो. शिवाय लहान मुलांना विविध खेळ खेळायला हे अंगण म्हणजे प्रशस्त जागा असून, तो अनुभवही त्यांच्यासाठी विशेष असतो. वयोवृद्ध माणसांकडून अशा मांडवांमध्ये अनेक प्रकारच्या गप्पा मारतानाचे अनेक प्रसंग आम्ही लहान असताना अनुभवले आहेत. भविष्यात पुढील पिढीला मात्र कोकणातील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अत्यंत स्वच्छ अंगण आणि मांडव पाहताही येणार नाही आणि ती मजाही अनुभवता येणार नाही.