शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

‘एलईडी’प्रश्नी प्रशासनावर नगरसेवकांची नाराजी

By admin | Updated: March 18, 2017 22:43 IST

नगराध्यक्षांचे आदेश : बंद दिवे बदलून घ्या

मालवण : शहरात एलईडीचा प्रश्न चर्चेत असताना अखेर अपेक्षेप्रमाणे पालिका सभागृहात अनपेक्षित एलईडीचा विषय चांगलाच गाजला. शहरात बसविण्यात येत असलेले एलईडी दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते गणेश कुशे यांनी करत एलईडीवर वादळी चर्चा करण्यास रान मोकळे करून दिले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.दरम्यान, संबंधित ठेकेदाराला नगरसेविका पूजा करलकर यांच्या मागणीनुसार सभागृहात पाचारण करून माहिती घेण्यात आली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही प्रशासनाला ठेकेदारांकडून बंद पडलेल्या दिव्यांची पहिली दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर नवे दिवे बसविण्याची कार्यवाही करा असे आदेश दिले.मालवण पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, पंकज साधये, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, यतीन खोत, मंदार केणी, शीला गिरकर, दर्शना कासवकर, ममता वराडकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे, पूजा करलकर, पूजा सरकारे, सेजल परब आदी उपस्थित होते.एलईडी दिवे बसविण्यापूर्वी आक्षेप घेणे चुकीचे आहे. वादळी चर्चा करण्यापेक्षा पालिकेने एलईडी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी मंदार केणी यांनी केली. शहरातील एलईडीची कार्यवाही योग्य रीतीने सुरु आहे. ‘इलेक्ट्रिक पार्ट नो गॅरंटी’ असे सांगत काही दिवे तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. मात्र ठेकेदारांकडून बदलून देण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय धोरणाला विरोध करणे आक्षेपार्ह आहे. एलईडीचे स्वागत जनता करत असताना त्याला कोणी विरोध करून नये, असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यात खडाजंगीएलईडीचा विषय नगरसेवकांनी चांगलाच तापविला असताना उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. नगराध्यक्षांच्या नावाने काही नगरसेवकांनी एलईडी बसविण्याचे तर काहींनी बसविण्यात येवू नये, अशी पत्रे दिली असताना नगराध्यक्ष प्रशासनावर ढकलत आहे, असे वराडकर यांनी सांगताना मुख्याधिकारी व आपल्यात समन्वय असून एलईडी बसविण्याची कार्यवाही असल्याचे स्पष्ट केले.नगरसेवक प्रशासनाचे नोकर नाहीतएलईडी विषयवार प्रशासनाचा अंकुश नसल्याचे करलकर यांनी सांगितले. नगरसेवक म्हणजे प्रशासनाचे नोकर नाहीत. एलईडीचे प्रशासनाकडून नियोजन झाले नसल्याने नगरसेवक बदनाम होत असल्याचे आप्पा लुडबे यांनी सांगितले. तर बंद एलईडी दिव्यांवर कार्यवाही झाल्यानंतर ठेकेदाराने बंद एलईडीचे कारण पालिकेला देण्याची सूचना केली. नगरसेवक यतीन खोत यांनी बंद दिवे बदलण्याची कार्यवाही न झाल्यास मेणबत्ती आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले.