शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अपात्रता अर्ज फेटाळला

By admin | Updated: January 10, 2017 22:33 IST

कणकवली नगरपंचायत : पारकर गटाला दिलासा; काँग्रेसला धक्का

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, विद्यमान नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह पाच नगरसेवकांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेटाळला आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील पारकर गटाच्या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला, तरी काँग्रेस पक्षाला एकप्रकारे हा धक्काच आहे. नगरसेविका सुविधा साटम यांनी काँग्रेसच्यावतीने हा अपात्रतेविषयीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांची नगराध्यक्ष म्हणून, तर समीर नलावडे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या पदांच्या निवडीसाठी २९ सप्टेंबर २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती.यावेळी नगरपंचायतीतील समीर नलावडे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम, तर उपनगराध्यक्षपदासाठी गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच काँग्रेसचे हे अधिकृत उमेदवार असल्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले होते. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना त्यांना मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता. तर संदेश पारकर गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष पदासाठी कन्हैया पारकर यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच आपण गटनेता असल्याचे जाहीर करीत राधाकृष्ण ऊर्फ रूपेश नार्वेकर यांनी या दोघांना संबंधित पदांसाठी उमेदवारी दिल्याचे घोषित केले होते.त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या तीन व भाजपच्या एका नगरसेवकाच्या मदतीने माधुरी गायकवाड व कन्हैया पारकर निवडून आले होते.त्यामुळे अ‍ॅड. प्रज्ञा खोत, रूपेश नार्वेकर, माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी यांनी पक्षविरोधी कृत्य करीत बंडखोरी केली असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुविधा साटम आणि गणेश हर्णे यांच्याविरोधात पक्षादेश डावलून विरोधी मतदान केल्याचे सांगत नगरसेविका सुविधा साटम यांनी पारकर गटाच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ४ नोव्हेंबर २०१५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यामुळे त्या पाच नगरसेवकांना याबाबत खुलासा देण्यासाठी ९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान ७ जून २०१६ रोजी अनिल भंडारी यांची बदली झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या उदय चौधरी यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली. या अर्जाबाबत सव्वा वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तसेच कागदपत्र पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे.संदेश पारकर गटातर्फे अ‍ॅड. उमेश सावंत यांनी या तक्रार अर्जाबाबत युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)