शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -रशियन महिला कणकवलीत, यंत्रणेची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:16 IST

मुंबईहून गोव्याला खासगी आरामबसमधून जाण्यासाठी निघालेली एक रशियन पर्यटक महिला शुक्रवारी कणकवलीत पोहोचली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देरशियन महिला कणकवलीत, यंत्रणेची उडाली तारांबळ आरोग्य तपासणीनंतर गोवा येथे रवानगी

कणकवली : मुंबईहून गोव्याला खासगी आरामबसमधून जाण्यासाठी निघालेली एक रशियन पर्यटक महिला शुक्रवारी कणकवलीत पोहोचली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.

या रशियन पर्यटक महिलेने बसस्थानकासमोरील थांब्यावरून आरोग्य पथकाला हूल दिली. तसेच ती रेल्वे स्थानकात गेली. तेथे रेल्वे पोलिसांच्या साह्याने तिला ताब्यात घेण्यात आले. कणकवलीत शासकीय विश्रामगृहात आरोग्य तपासणी केल्यानंतर त्या महिला पर्यटकाची रवानगी गोवा येथे करण्यात आली आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर पोलीस बंदोबस्तासह आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून सर्वच पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. रशिया, बेलारूस येथील एक पर्यटक महिला गोवा येथे असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी भारतात आली आहे.

गेले काही दिवसा या महिला पर्यटकाने नेपाळ दर्शन केले. त्यानंतर गुजरात दर्शन करून ही महिला शुक्रवारी गोवा येथे खासगी आराम बसमधून जात होती. वैभववाडी तालुक्यातील करूळ चेकनाक्यावरील आरोग्य तपासणी पथकाला खासगी आरामबसमध्ये विदेशी महिला असल्याचे लक्षात आले. या पथकाने ही बाब जिल्हा आरोग्य विभागाला कळविली होती.त्यानुसार कणकवली बसस्थानकालगतच्या थांब्यावर तालुक्यातील आरोग्य पथक सज्ज झाले होते. सकाळी ११ च्या सुमारास आरामबस कणकवलीत दाखल झाली. त्यावेळी त्या रशियन महिलेला आरोग्य पथकाचा ताफा दिसला. हे आरोग्य पथक आपलीच तपासणी करणार हे लक्षात येताच त्या महिलेने रिक्षा करून थेट कणकवली रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यामुळे आरोग्य पथकाची तारांबळ उडाली.त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने कणकवली आणि रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी तसेच रेल्वे स्थानकावरील आरोग्य पथकाने त्या रशियन पर्यटकाला तिथेच अडवून ठेवले.कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्यासह आरोग्य पथकाने त्या रशियन महिला पर्यटकाला ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यानंतर कणकवली शासकीय विश्रामगृहातील विलगीकरण कक्षात तिला आणले. तिच्या तपासणीत कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या सर्वच मार्गांवर चोवीस तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून सर्वच पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.संजय पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग