शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - नाटळ येथे मोफत मास्क, साबणाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:17 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीपर मागदर्शन करण्यात आले. ​

ठळक मुद्देनाटळ येथे मोफत मास्क, साबणाचे वाटप, कोरोनाबाबत मार्गदर्शन थ्रेशोल्ड, थ्री डॉटस् या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम

कनेडी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीपर मागदर्शन करण्यात आले.थ्रेशोल्ड ही आर्किटेक्चर कंपनी तर थ्री डॉटस् ही अ‍ॅडव्हरटायझिंग कंपनी असून या दोन्ही कंपन्यांचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अवधूत सावंत (डोंगरे) आहेत. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी बरीच वर्षे काम करून नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक बांधीलकी जपत समाजकार्य ते करीत आले आहेत. येथील ग्रामस्थ कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून मास्क व साबणाचे वाटप या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी नाटळ उपसरपंच दत्ताराम खरात, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे, निवृत्त पोलीस अधिकारी कृष्णाजी सावंत, कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. फाटक, माहिती अधिकारी तथा आरोग्य सहाय्यक सूर्यकांत आगटे, माजी एसटी वाहक सदानंद मराठे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वृध्द, अंध, लहान मुले, महिला यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. डॉ. फाटक यांनी कोरोना संसर्ग कसा होतो, त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. आगटे यांनी स्वच्छतेबाबत माहिती दिली. उपसरपंच खरात यांनी ग्रामस्थांना जागृत राहण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग