शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:18 IST

सर्जेकोट येथील कृष्णा चंद्रकांत आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या २४ पैकी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या २२ जाळी तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एका ट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजाळी तोडून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखलट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

मालवण : सर्जेकोट येथील कृष्णा चंद्रकांत आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या २४ पैकी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या २२ जाळी तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एका ट्रॉलरवरील अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्जेकोट येथील कृष्णा आचरेकर हे १३ सप्टेंबरला सर्जेकोट येथील समुद्रात आपल्या स्वामी समर्थ नौकेने मासेमारीस गेले होते. १४ सप्टेंबरला मध्यरात्री त्यांनी अकरा वावात मासेमारीसाठी २४ जाळी समुद्रात टाकली होती. याच परिसरात मासेमारी करणाऱ्या एका ट्रॉलर्सने ही २४ जाळी तोडली. यातील दोन जाळी ओढण्यात आचरेकर यांना यश आले तर सुमारे एक लाख रुपये किमतीची २२ जाळी त्या ट्रॉलरवरील अज्ञातांनी ट्रॉलरमध्ये ओढत चोरून नेल्या.त्या ट्रॉलरवर रोक्कू (२) असा उल्लेख आहे अशी तक्रार आचरेकर यांनी मंगळवारी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर, संतोष गलोले हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग