शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी उत्पादने घरबसल्या मिळण्याची सोय

By admin | Updated: September 18, 2016 00:01 IST

ई-मार्केटचा उपक्रम : ‘कोकण ई मार्केट प्रा. लि.’ कंपनीची स्थापना

कणकवली : कोकणातील प्रसिद्ध मेवा, खास मसाले तसेच कलाकृतींबरोबरच कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना सर्वदूर पोहचविण्यासाठी आकाश आवटे, अमित आवटे, हरिष गणपत्ये, सुनील निल्ले यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ‘कोकण ई-मार्केट प्रा. लि.’ या कंपनीची त्यांनी स्थापना करून स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून कोकणातील उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रभर घरोघरी पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.देशभरातल्या मार्केटिंग क्षेत्रात सध्या ई-मार्केटिंगचा चांगला दबदबा निर्माण झाला आहे. अनेक ई-मार्केटिंग कंपन्या एकाचवेळी अनेक उत्पादने घेऊन या क्षेत्रात कार्यरत आहेत. एखाद्या विशिष्ट भागातील उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र कंपनी असली तर त्या भागातील उत्पादनांना चांगला न्याय मिळू शकतो. यासाठीच कोकण ई-मार्केट प्रा. लि. या कंपनीची स्थापना करण्यात आल्याचे अमित आवटे यांनी सांगितले. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीकडून ६६६.‘ङ्म‘ंल्लें१‘ी३.ूङ्मे ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर केले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते.या कंपनीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर अभिनेते भाऊ कदम हे आहेत. तर कोकणातील आंबा, काजू, कोकण तडका, कोकण मिठास, कोकण चटपटा, कोकण दालन, कोकण गावरान आदी ब्रँडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खवय्यांना कोकणी पदार्थांची चव चाखता येणार आहे. विविध लोणची, मुरांबा, मालवणी ठेचा ही या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर सावंतवाडीची लाकडी खेळणी, जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोळकर यांच्या चित्रकृती, लाकडाचे तसेच बांबूचे दर्जेदार फर्निचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुरियर सेवा तसेच पोस्टाच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्यात येणार आहे. कोकणातील पदार्थांच्या विक्रीसाठी ई-मार्केटिंगचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे कोकण ई- मार्केट प्रा. लि. कंपनीचे संचालक अमित आवटे, आकाश आवटे, हरीश गणपत्ये यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)