शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

डीटीएच प्रशिक्षणात वादंग

By admin | Updated: April 8, 2015 23:53 IST

मंडणगडातील प्रकार : अनुदान विद्यार्थ्यांनीच काढले

मंडणगड : मंडणगड येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डीटीएच डीश बसवणे व तिची देखभाल, यासाठी एका खासगी कंपनीच्या मदतीने एक महिना कालावधीचा कोर्स चालवला जात आहे. या कोर्ससाठी प्रतिविद्यार्थी देण्यात येणारे अनुदान शासनाने कंपनीच्या खात्यात जमा न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले. अनेक विद्यार्थ्यांनी ही रक्कम काढल्याने कंपनीने अनुदानासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क प्रशिक्षण संस्था आकारत नाही, हे खरे असले तरी प्रशिक्षण चालवणाऱ्या कंपनीला शासन प्रतिविद्यार्थी अनुदान देते, यात प्रशिक्षणार्थीच्या विविध खर्चाचा समावेश आहे. हा शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यावर शासनाने दहा हजार रुपयांचे अनुदान वर्ग केले. यातील काही विद्यार्थ्यांनी ही रक्कम आपल्या खात्यातून काढल्याने कंपनीच्या व्यवस्थापनाने ही रक्कम प्रशिक्षण खर्चापोटी परत करण्याचा तगादा लावल्याचा गंभीर प्रकार पुढे याच प्रशिक्षण कार्यक्रमात आला आहे.यासंदर्भात प्रशिक्षण सस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांना कुठल्याही प्रश्नांचा समर्पक खुलासा करता आला नाही. संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या कोर्सला विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली का, त्यांचे प्रवेशपत्र भरुन घेतले का? शासनाच्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात आला? जमा झालेल्या रकमेत विद्यार्थ्यांचे विद्यावेतन किती व खर्च किती? कंपनीचे प्रशिक्षण शुल्क किती? अशा विविध प्रश्नांवर प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी मौन बाळगले.शासनाला अनुदानच द्यायचे होते तर शासनाने ते थेट कंपनीच्या खात्यामध्ये का जमा केले नाही? विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांनी विनाहिशोब कंपनीकडे का जमा करावी? असे अनेक प्रश्न या घटनाक्रमामुळे निर्माण झाले असून, प्राचार्यांनी यासंदर्भात पाच ते सहा दिवसात खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तक्रारग्रस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्यातील रक्कम कंपनीकडे वर्ग करण्यास विरोध केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणाला वाचा फोडणारे रिपाइंचे जिल्हा युवक अध्यक्ष आदेश मर्चंडे यांनी विद्यार्थ्यांना संबंधित कंपनीच्या आस्थापनेने खर्चाचे हिशोब व शुल्क आकारणीच्या अधिकृत पावत्या देण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)