शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अंशदान निवृत्तीयोजनेची अंमलबजावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:03 IST

शिक्षकांमध्ये नाराजी : १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांसाठी योजना

आनंद त्रिपाठी --वाटुळ --१ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या १०० टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीचे आदेश शासनाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काढले आहेत.ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू असल्याने शिक्षकांना त्यांच्या मूळ वेतनातून चालू महिन्याचा हप्ता व मागील थकबाकीचा एक हप्ता असे दोन - दोन हप्ते म्हणजेच मूळ वेतनाच्या २० टक्के रक्कम कापली जाणार आहे.पाच वर्षांसाठी एकदाच निवडून आलेल्या आमदार, खासदारांना आयुष्यभरासाठी पेन्शन लागू आहे, मग आम्ही तर वयाच्या ५८व्या वर्षापर्यंत ज्ञानदानाचे पवित्र काम करुनदेखील शासन आमच्याच पगारातील रक्कम कापून आम्हाला तुटपूंजी पेन्शन देणार असेल, तर हा किती मोठा विरोधाभास आहे. शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन सर्वांसाठी एकाच न्यायाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राजापूर तालुक्यातील ‘पेन्शन बचाव’ संघटनेच्या शिक्षकांनी केली आहे. ...अन्यथा आमच्यासमोर सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय नसेल, असेदेखील शिक्षकांनी बोलून दाखविले आहे.तारेवरची कसरतप्रत्येक महिन्याला अंदाजे ३ ते ४ हजार रक्कम खात्यातून वजा होणार असल्याने हाती येणाऱ्या पगारातून घर चालविण्याची मोठी कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे.धाबे दणाणलेअनेक शिक्षकांनी जागा, प्लॅट, गाडी आदींची खरेदी केली असून अनेकांवर १५ ते २० लाखापर्यंतची बँकांची कर्ज आहेत. बँकेचे हप्ते भरुन घर चालवित असताना अचानक ३ ते ४ हजारांची कपात होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक तंगीमुळे समाजात वावरताना अनेक यातना भोगाव्या लागतील. वार्धक्यामध्ये ‘पेन्शन’ हे एकमेव जगण्याचे साधन असते आणि शासन यावरच गदा आणत असेल तर मग सरकारी नोकऱ्यांचे महत्वदेखील कमी होईल. सर्वच शिक्षक संघटनांनी आमच्या या गहन प्रश्नाविषयी एकत्र येऊन आवाज उठवावा.- धनाजी हजारे, क्रीडाशिक्षक, आदर्श विद्यामंदिर, वाटूळ.मूळ वेतनाच्या २० टक्के रक्कम कपात होणार.आमदार, खासदारांना आयुष्यासाठी पेन्शन लागू, मग शिक्षकांनाच का नाही?शिक्षकांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही; अनेकांच्या प्रतिक्रिया.