शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरला आग लागून चालक जखमी

By admin | Updated: July 15, 2016 22:36 IST

लांजानजीक कुवे येथील दुर्घटना

लांजा : गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा केला. क्षणार्धात कंटेनरची केबिन जळून खाक झाली. त्यात कंटेनरचालक सैतानसिंग वैष्णोई भाजला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लांजानजीक कुवे येथे घडली.सैतानसिंग वैष्णोई (वय २६, सरान, ता. बिलारा, जि. जोधपूर, राजस्थान) हा आपला कंटेनर (आरजे १९ जीबी ७३९२) घेऊन सोमवारी (दि. ११) गुजरातहून गोव्याकडे निघाला होता. मंगळवारी (दि. १२) चिपळूण येथे कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने त्याने कंटेनरची ट्रॉली दुसऱ्या कंटेनरला जोडून पाठवून दिली. कंटेनर दुरुस्त झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) तो चिपळूण येथून निघाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता गोव्याच्या दिशेने जाण्यास निघाला. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कुवे येथे ट्रकच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत कंटेनर बाजूला उभा केला आणि क्षणार्धात कंटेनरच्या केबिनला आग लागली.मालकच स्वत: चालक असल्याने त्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे हात, पाय व केस होरपळून निघाले. त्यामुळे त्याने आग पेटत असलेला कंटेनर सोडून तो औषधोपचारासाठी खासगी वाहनाने ओणी येथे गेला. कंटेनरला आग लागल्याचे पाहून उमेश काशिनाथ सावंत, प्रसाद रामेश्वर चव्हाण यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने लांजा येथील बाळा शेट्ये व पिंट्या भाळेकर यांनी टाकीतून पाणी मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच पोलिस फौजदार सुरेश महाडिक, शशिकांत सावंत, संतोष झापडेकर, राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)