शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पवनचक्क्यांची उभारणी लवकरच

By admin | Updated: July 18, 2014 23:15 IST

दमदार संयंत्रे बसविली जाणार : वीज वितरण कंपनीची माहिती

देवगड : देवगडच्या जुन्या पवनचक्की प्रकल्पाच्या जागी आता आठ नवीन व अधिक दमदार संयंत्रे बसविली जाणार आहेत. त्यांच्या पायाभरणीचा भाग पूर्ण झाला असून सप्टेंबरअखेरीस नवीन पवनचक्क्यांची उभारणी सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. देवगड तालुक्याची विजेची गरज ७ मेगावॅट आहे. नवीन पवनविद्युत प्रकल्पाद्वारे १० मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून उर्वरित ३ मेगावॅट वीज मुख्य ग्रीडला जोडली जाईल. प्रत्येक १२५० के. डब्ल्यू. क्षमतेची ८ संयंत्रे वर्षभरात कार्यान्वित होती, असा विश्वास कंत्राटदार सुझलॉन कंपनीने व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुका वीज क्षेत्रातील स्वयंपूर्ण तालुका म्हणून अग्रेसर राहील. सुझलॉन कंपनीच्या पवनचक्की संयंत्राचा मॉडेल क्र. एस ६६ आहे. प्रत्येक संयंत्राची वीजनिर्मिती क्षमता १२५० के. डब्ल्यू. इतकी आहे. पवनचक्कीच्या मूळ टॉवरची उंची ७४.५ मीटर इतकी आहे. रोटर डायमीटर ६६ मीटर इतका आहे. कट इन बिंड स्पीड ४ मीटर सेकंद इतका आहे. अधिकतम स्पीड २० मीटर सेकंद इतका आहे. या पवनचक्कीचा रोटर ५२ मीटर सेकंद इतका वाऱ्याचा जोर सहन करू शकते. प्रत्येक पवनचक्कीला ३ ब्लेड्स असतील. टॉवरचे वजन ९४७५० किलो तर ३ ब्लेड्सचे वजन ९९९० किलो इतके आहे. प्रत्येक पवनचक्कीचे एकूण वजन १,६३,०४० किलो इतके भरेल. या प्रकल्पातील वीज स्वतंत्रपणे ३३ केव्ही लाईन यंत्रणेद्वारे मूळ यंत्रणेशी जोडली जाईल व वीज पुरवली व साठवली जाईल. मूळ प्रकल्पातील जुनी व कालबाह्य संयंत्रे जानेवारीमध्ये स्क्रॅप करून काढून नेण्यात आली. फाऊंडेशनचे काम मार्चपूर्वी सुरू होऊन जूनमध्ये पूर्ण करण्यात आले. या संयंत्राद्वारे प्रत्येकी १९.७७ लाख युनिट्स डब्ल्यूइजी इतकी वीजनिर्मिती होईल. यातून निर्माण झालेली वीज जामसंडे येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये जोडली जाईल. ९५ टक्के क्षमतेची खात्री देऊन वीजनिर्मिती होईल, असे सुझलॉन कंपनीने लिखित स्वरूपात मान्य केले आहे. या सर्व प्रकल्पांतर्गत सुझलॉन कंपनीने अप्रोच रोडमध्ये सुधार किंवा बदल अंतर्गत रस्ते वाहतूक व्यवस्था निर्मिती, टॉवर फाऊंडेशन निर्मिती, टॉवर उभारणे, बांधणी व सुरूवात करून वीज निर्मितीही सुरू करायची आहे. यामध्ये या सर्व ८ संयंत्रांद्वारे १० मेगावॅट वीज निर्मितीची खात्री द्यायची आहे. अंतर्गत ३३ केव्ही वीजवाहिन्या देण्याचेही मान्य केले आहे. या सर्व प्रकल्पाची देखरेख व देखभाल पुढील १० वर्षे सुझलॉनची जबाबदारी राहणार आहे. तर सर्व सरकारी परवानग्या, मुख्य रस्त्यापासून साईटपर्यंत वाहतूक व्यवस्था, साईट बाहेरील ३३ केव्ही विद्युतवाहिन्या उभारणी व जामसंडे सबस्टेशनपर्यंतची वीज वाहतूक तसेच वीजनिर्मिती व साठवणूक परवाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची जबाबदारी राहील हे कंत्राट करारात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ७० ते ८० कोटी रूपयांच्या अंदाजित व सुधारीत खर्च अंदाजाच्या या प्रकल्पाने महाराष्ट्रातील एक वीज निर्मितीतील स्वयंपूर्ण तालुका म्हणून देवगडचे नाव अग्रेसर राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)