शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बांधकामांना येणार वेग...

By admin | Updated: May 23, 2015 00:31 IST

वाळू उपशावरील बंदी उठली : १३ ड्रेझर्स, १९ हातपाटी व्यावसायिकांना मिळणार परवाना

रत्नागिरी : राज्य सरकारने कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील वाळू उत्खननावरील बंदी उठवल्याने गेल्या काही काळापासून ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय वेग घेणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १३ ड्रेझर्स व १९ हातपाटी व्यावसायिकांना या निर्णयामुळे लाभ होणार असून, आवश्यक परवानग्यानंतर वाळू उपसा जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. कोकणातील वाळू उपशावर शासनाने २०११ पासून बंदी घातली होती. त्यामुळे घरे बांधकामासाठी तसेच अपार्टमेंट्स व अन्य बांधकामांसाठी आवश्यक असलेली वाळू मिळेनाशी झाली होती. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना होती. बांधकामेच अडून राहू लागल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. ही बंदी उठवावी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडेही रत्नागिरी दौऱ्यात मागणी करण्यात आली होती. त्यांनी ही बंदी उठविण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर तीन महिन्यांनंतर राज्य सरकारने या चार जिल्ह्यातील वाळू उपशावरील बंदी गुरूवारी उठविल्याने समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयानंतर जिल्ह्यातील वाळू उपसा कामांना वेग येणार आहे. जिल्ह्यात विविध भागात वाळू उपसा करणारे १३ ड्रेझर्स आहेत. त्यातील दाभोळ खाडीत ६, विजयदुर्ग-रत्नागिरी खाडीत ५, तर जयगडमध्ये २ ड्रेझर्स आहेत. ड्रेझरद्वारे वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनकडून ड्रेझर्सधारकांना नाहरकत प्रमाणपत्र घ्यावी लागणार आहेत. याशिवाय जिल्ह्यात हातपाटी व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २० हातपाटी व्यावसायिक गट आहेत. चिपळूणमध्ये ४ गटाना मान्यता आहे. आंजर्लेत ६ हातपाटी गट आहेत. तसेच करजुवे-संगमेश्वरमध्ये १, पालशेतमध्ये २, मालगुंडमध्ये २, जैतापूरमध्ये २ व काळबादेवी येथे २ हातपाटी गट आहेत. या सर्व गटांना आता वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्याबाबत हालचाली आता ड्रेझर व्यावसायिक व हातपाटी व्यावसायिकांनी सुरू केल्या आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात हातपाटी व्यावसायिकांना परवानगी दिली होती. नंतर पुन्हा बंदी आणली गेली होती. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सर्वच प्रकारच्या वाळू उपशावरील बंदी उठविल्याने कोकणवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)चार वर्षांपासून असलेल्या वाळू उपसा बंदीमुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाळूची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली होती. बांधकामे थांबू नयेत म्हणून ही परजिल्ह्यातील महागडी वाळू खरेदी करण्यावाचून बांधकाम व्यावसायिकांपुढे अन्य पर्याय नव्हता. खर्च वाढल्याने घरेही महागली होती.