शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

आगामी निवडणुकीत भाजप तिकीट देईल का याचा विचार करा, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

By सुधीर राणे | Updated: March 13, 2023 17:02 IST

मला पक्षात घ्या, म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही

कणकवली: स्वत:चा स्वाभिमान पक्ष सात महिने जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांनी  शिवसेनेला जिवंत ठेवण्याची भाषा करू नये. भाजपाने तिकीट वाटपाचा अधिकार आमदार नितेश राणेंना दिलेला नाही. उलट आगामी निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळते का? ही शंका आहे. भाजपाची वरिष्ठ मंडळी त्यांना किती दिवस पक्षात जिवंत ठेवणार याचा त्यांनी आधी विचार करावा. मला पक्षात घ्या, म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आमदार नितेश  राणे यांना लगावला आहे.कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, ॲड. हर्षद गावडे, प्रमोद मसुरकर, गोट्या कोळसुलकर, उत्तम लोके, वैद्येही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख सोडाच पण साधा निष्ठावान शाखाप्रमुखही आमदार नितेश राणेंच्या संपर्कात येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत अकरा आमदार होते. आज काय स्थिती आहे. त्यावेळी निवडणुका आल्यावर आघाडीची सत्ता येणार याची चाहूल लागताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काँग्रेसची सत्ता जाणार हे समजताच भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे केवळ स्टंटबाजीशिवाय काहीच करत नाहीत. उलट आमदार वैभव नाईक कुडाळ मालवण मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. राणेंनी निधीची केलेली घोषणा ही कागदावरची आहे. त्यामुळे जूनमध्ये समजेल त्यापैकी  किती कामे झाली आहेत. घाट रस्त्यासाठी  ४०० कोटीचा निधी आला असल्याचे ते सांगत आहेत, पण गगनबावडा रस्त्याची स्थिती  काय आहे? ठेकेदार भेटायला यावेत व कार्यकर्ते आपल्याबरोबरच थांबावेत यासाठी २ हजार कोटीचा निधी मंजूर केला असे सांगून  त्यांची धडपड चालू ठेवली आहे.गद्दारीनंतरही जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही खेडमधील जी सभा झाली, ती विरोधकांना धडकी भरविणारी होती. जनता आमच्यासोबत असून आगामी निवडणुकीत मतदारच विरोधकांना चपराक देतील व सिंधुदुर्गातील तीनही आमदार व खासदार आमचेच असतील असेही सतीश सावंत म्हणाले.ते पुढे म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाप्रमुख म्हणून संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, वैभव नाईक, अरूण दुधवडकर, गौरीशंकर खोत यांना आपण धन्यवाद देतो. पक्षप्रमुखांना अपेक्षीत असलेले काम आपण या मतदारसंघात करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी करण्यात येणार आहे. तालुका व विभाग निहाय बैठका, आवश्यकतेनुसार वरिष्ठांशी चर्चा करून नविन नियुक्त्या, बुथ सक्षम करणे आदी कामे केली जातील.कोणत्याही स्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील सर्वांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील असे सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Satish Sawantसतीश सावंत