शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

By admin | Updated: September 7, 2016 23:55 IST

सुरेश प्रभू : बंदर धोरण लवकरच; प. महाराष्ट्रसह देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे जोडणार

मालवण : कोकणातील पर्यटनामुळे देशासह विदेशातील हौशी कोकणाशी कनेक्ट झाले आहेत. पर्यटनाबरोबरच कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून संपूर्ण भारत देश कोकणला जोडण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून कऱ्हाड ते चिपळूण आणि वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गांमुळे पश्चिम महाराष्ट्रसह भारतातील प्रमुख शहरे कोकणला ‘कनेक्ट’ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुढाकार घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मेढा येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती देताना येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण देशाशी जोडले गेलेले असणार आहे. केंद्राच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. कोकणला जोडण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गांमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणला प्रगतीची दिशा मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बंदरांचाही विकास करणारमंत्री प्रभू म्हणाले, भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बंदरांची प्रगती न झाल्याने भारताच्या किनारपट्टीवर म्हणावा तसा विकास साध्य करता आला नाही. मात्र, याबाबत मोदी सरकार सकारात्मक असून, भारतातील बंदरांना चालना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांना गतवैभव व चालना मिळून येथील भागाचा विकास साधण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच कोकणातील बंदरांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी युती हवीच!जिल्ह्यात होत असलेल्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबत विचारले असता प्रभू म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेत युती होणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गातील मतदार मोठ्या प्रमाणात युतीचाच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांत युती व्हावी ही आपली इच्छा असून, याचा फायदाही मतदारांना होणार आहे. जिल्ह्यात युती होण्यासाठी आपणही प्रयत्न करणार आहोत.