शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडून घ्यावे

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

के. मंजुलक्ष्मी : ३१ जुलैपर्यंत राबवली जाणार मोहीम, मतदारांना आवाहन

 राजापूर : राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी आपले निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडून घ्यावे, असे आवाहन राजापूरच्या परिविक्षाधिन तहसीलदार के. मंजुलक्ष्मी यांनी आयोजित पत्रकार परिषदेवेळी केले आहे. हा कार्यक्रम ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती यावळी राजापूरचे निवडणूक नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दिनांक १ जानेवारीचा मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाला या याद्यांमध्ये दुबार मतदारांच्या नोंदी, दुबार फोटो, दुबार ओळखपत्र क्रमांक इत्यादी चुका व दोष असल्याचे दिसून आल्याने नागरिकांना नावनोंदणी व दुरुस्ती यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आयोगाने हा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राजापुरात या कार्यक्रमाची सुरुवात ३ मार्चपासून करण्यात आल्याची माहितीही तहसीलदार के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. राजापूर तालुक्यात १ लाख २४ हजार ३६६ मतदार आहेत. त्यातील ३ हजार ७४५ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र नसल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. १ जानेवारीच्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील ७ हजार ७५९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तरीही या यादीमध्ये चुका असल्याचे निदर्शनास आल्याने व मतदार यादीतील वगळणी, चुकांची दुरुस्ती याबाबत ठोस कार्यपध्दती अवलंबली जात नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मतदार आपले आधार कार्ड निवडणूक ओळखपत्राशी जोडू शकतात, तसेच नमुना ‘अ’चा अर्ज भरुन निवडणूक नायब तहसीलदारांकडे भरुन देऊनही आपले आधारकार्ड निवडणूक ओळखपत्राशी जोडू शकतात, अशी माहितीही यावेळी बोलताना निवडणूक नायब तहसीलदार मुसळे यांनी दिली. तसेच मतदार आपले आधारकार्ड निवडणूक आयोगाच्या टोल फ्रीक्रमांक १९५० वर कॉल करुन किंवा ५१९६९ या नंबरवर एसएमएस करुनही जोडू शकतात, असेही यावेळी मुसळे यांनी बोलताना सांगितले. तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत आधारकार्ड गोळा करुनही त्याची नोंदणी केली जाणार आहे, यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी दारोदारी भेटी देऊन मतदारांकडून आधारकार्ड क्रमांक गोळा करणे, मतदार नोंदणी अधिकारी यांनी माहिती मतदार सुविधा केंद्र, महा - ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्रामार्फत गोळा करून. आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करायची आहे, अशी माहितीही मुसळे यांनी दिली. (प्रतिनिधी)