शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: October 30, 2015 23:11 IST

रणजीत देसाई : रस्त्यांची डागडुजीसाठी आठ दिवसात करण्याची मागणी

कुडाळ : तालुक्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी येत्या आठ दिवसात झाली नाही तर संपूर्ण तालुक्यात एकाचवेळी राष्ट्रीय काँगे्रसच्यावतीेने दिवाळीपूर्वी चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेतून दिला.कुडाळ राष्ट्रीय काँगे्रस कार्यालय येथे तालुक्यातील काँगे्रसचे नेते व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, काँगे्रस विभागीय अध्यक्ष विनायक राणे, काँगे्रस तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, लोकसभा युवकचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, अस्मिता बांदेकर, कुडाळ शहर काँगे्रस अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँगे्रसचे अध्यक्ष सुनील बांदेकर, प्रसाद पडते, अनिल खडपकर उपस्थित होते.यावेळी देसाई म्हणाले, महामार्गावरील शौचालयाची इमारत ही शहरात येणाऱ्या राज्यमार्गाच्या अगदी लगत बांधण्यात येत होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या निकषानुसार शहराचा विकास करताना रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात ही इमारत पाडावी लागणार आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम राज्यमार्गापासून ३७ मीटरपासून पुढे करावे, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एस. झेंडे यांना दिले होते. मात्र, या इमारतीचे काम रस्त्यापासून अगदी लगत सुरू झाले असून ५० टक्के काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तर तालुका डोंगरी भागात येत असल्याने रस्त्यापासून ५ मीटर अंतराच्या बांधकाम करता येऊ शकते, असे लेखी पत्र कुडाळ तालुका काँग्रेसला सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता झेंडे यांनी दिले आहे. यामुळे तालुक्यातील बऱ्याच जणांची रस्त्या लगतची बांधकामे वाचतील. जमीन वाचेल, कोणतीच बांधकामे तोडावी लागणार नाहीत, असे देसाई म्हणाले.यावेळी कुडाळच्या उपअभियंता झेंडे यांनी ५ मीटर अंतराबाहेर बांधकाम हे लेखी पत्र दिले खरे मात्र प्रांताधिकारी, तहसील तसेच इतर बांधकामांना परवानग्या देणाऱ्या सर्व कार्यालयातून ३७ मीटरच्या बाहेरच बांधकामास परवानगी देण्याचा निर्णय आजपर्यंत तरी आहे. त्यामुळे रस्त्यापासून ५मीटर बाहेर बांधकाम करता येते, हा निकष झेंडे यांनी कसा काढला, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.(प्रतिनिधी)दिवाळीपूर्वी चक्काजाम : रस्ता दुरुस्तीची मागणीसार्वजनिक बांधकाम विभागाने खराब झालेल्या तालुक्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी गणेश चतुर्थीपूर्वी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही रस्त्यांची डागडुजी झाली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याची डागडुजी झाली नाही तर संपूर्ण तालुक्यातील सर्व रस्त्यावर एकाचवेळी राष्ट्रीय काँगे्रस चक्काजाम आंदोलन दिवाळीच्या तोंडावर छेडणार, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला देसाई यांनी दिला. यावेळी कुडाळ तालुका काँगे्रसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.