शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

मालवणात काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: August 4, 2015 00:08 IST

सरपंच, उपसरपंच निवड : दोन ग्रामपंचायती शिवसेनेकडे

मालवण : तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर काँग्रेसने तर दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे विराजमान झाले. सोमवारी तालुक्यातील सातही ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. बहुमतातील मसुरे-डांगमोडे, पेंडूर, कुणकवळे, गोळवण,( सर्व काँग्रेस), आडवली (काँग्रेस -राष्ट्रवादी) तर मसदे चुनवरे व चिंदर याठिकाणी शिवसेना असे बलाबल तालुक्यात दिसून आले.तालुक्यातील लक्षवेधी मसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर तर उपसरपंचपदी राहुल शिवाजी परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांनासोबत घेऊन गावचा विकास करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन प्रामाणिक काम करण्यात येईल असे नवनिर्वाचीत सरपंच पेडणेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, माजी सरपंच गायत्री ठाकूर, अशोक बागवे, महेश बागवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शिवाजी परब, ग्रामविकास अधिकारी एस. डी. चव्हाण, बाप्पा बागवे, अनिल खोत, वनिता कुंजरकर, कोमल शिंगरे, समीर ठाकूर, श्वेता तांबे, गोपी पालव, पूर्वा ठाकूर, रुपाली नाईक, शामा सावंत, संतोष पालव, उदय बागवे, माया मुणगेकर, रेश्मा पेडणेकर, ज्योती पेडणेकर, सुप्रिया कांबळी, आलम शेख, मनोहर मांजरेकर, मेघशाम पेडणेकर, सुरेश मसुरकर, महेश दुखंडे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निपानेकर यांनी काम पाहिले. पेंडूर-खरारे ग्रामपंचायत निवडणुकीत भावना प्रभू काँग्रेस यांनी शिवसेनेच्या अमिता नाईक यांचा सहा विरुद्ध पाच मतांनी पराभव करत सरपंचपदी विराजमान झाले. तर उपसरपंचपदी काँग्रेसच्या श्वेता फोंडेकर यांनी भाजपाच्या सत्वशीला पाटकर यांचा सात विरुद्ध चार मतांनी पराभव केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, संजय नाईक, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी नाईक आदी उपस्थित होते.गोळवण सरपंच बिनविरोधगोळवण सरपंच पदी काँग्रेसच्या प्रज्ञा चव्हाण तर उपसरपंच पदी सुभाष लाड बिनविरोध निवडून आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. राऊत, ग्रामसेवक पी. आर. सावंत यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळकर, विजय चव्हाण, मनोहर परब यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.सरपंचपदी शुभांगी मेस्त्री कुणकावळे सरपंचपदी काँग्रेसच्या शुभांगी मेस्त्री तर उपसरपंच पदी मंदार वराडकर यांची निवड केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन. व्ही. जाधव, ग्रामसेवक अशोक तिरवडकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळकर, दादा नाईक, आनंद वराडकर उपस्थित होते. (वार्ताहर)चिंदर, मसदे-चुनवरे शिवसेनेकडेचिंदर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदी माया सावंत तर उपसरपंच पदी अनिल गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समीर हडकर व शिवसेना विभागीय अध्यक्ष उदय दुखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय मिळवला होता. यावेळी चंद्रकांत हडकर, प्रकाश वराडकर, संजय हडपी, संजय माळकर, बाळा पाटणकर, सुरेश साटम, बाळा चिंदरकर, मिलिंद चिंदरकर, श्वेता नाटेकर, जयवंती पाटणकर, सीताराम हडकर, सुहास चिंदरकर, ममता पांचाळ, चारुशीला आचरेकर, प्रफुल्ल गोलतकर, भाग्यश्री घागरे, समीर लब्दे आदी उपस्थित होते.तर मसदे-चूनवरे ग्रामपंचायतीवर सरपंच पदी शिवसेनेच्या धाकू बाबुराव परब तर उपसरपंच भाग्यश्री सावंत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, राजा गावकर, विजय पालव आदी उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आडवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या शैला कदम सरपंचपदी विराजमान झाल्या. तर उपसरपंचपदी विनोद लाड यांची निवड झाली. यावेळी काँग्रेस विभागीय अध्यक्ष राजू परुळेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, उपतालुकाध्यक्ष विजय घाडीगावकर, माजी सरपंच राजश्री लाड आदी उपस्थित होते, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजित मदने यांनी काम पाहिले.