शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार

By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST

व्हिक्टर डॉन्टस : १९ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने ही निवडणूक पहिल्यांदाच काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. १९ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जिल्हा बँकेच्या उत्कर्षासाठी निवडणूक एकत्रित लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात माहिती देताना दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा बँक अध्यक्ष डी. बी. वारंग, संचालक सुरेश दळवी, विकास सावंत, गजानन गावडे, अविनाश माणगावकर, आत्माराम ओटवणेकर, गुलाबराव चव्हाण, आरती मर्गज, सुगंधा साटम आदी उपस्थित होते.याबाबत सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदतवाढ संपलेली होती. तिला पुन्हा मुदतवाढ मिळाली व ती मुदतवाढही आता संपत आल्याने संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. तसा निर्णयही यावेळी झाला आहे. सात वर्षे जिल्हा बँकेला जो कामाचा दर्जा मिळत आहे तसाच दर्जा यापुढेही राखला जावा, शेतकरी यांचा उद्धार व्हावा, त्यासाठीही संचालक मंडळाची निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारपासून प्रक्रिया सुरू होईल. व्हिक्टर डॉन्टस म्हणाले, जिल्हा बँकेची प्रगती राखण्यासाठी हा निर्णय घेतला. बँकेचे व शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)