शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

काँग्रेसमुक्त जिल्ह्याची सुरूवात नगरपंचायतीपासून

By admin | Updated: October 8, 2015 00:34 IST

प्रमोद जठार : वैभववाडीतील दत्तमंदिरातून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

वैभववाडी : देशातून काँग्रेसचे समूळ उच्चाटन केल्यानंतर भ्रष्टाचाराने बरबटलेली राज्यातील सत्ताही उलथवून टाकण्यात महायुतीला यश आले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची सुरुवात वैभववाडी व दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीने करीत आहोत, असे स्पष्ट करीत नगरपंचायतीची निवडणूक ही विकासाची लढाई आहे. त्यामुळे जनतेने महायुतीच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत केले.शहरातील दत्तमंदिरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर भाजप संपर्क कार्यालयात महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजू शेटये, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड हर्षद गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सावंत, नंदू शिंदे, मंगेश लोके, उत्तम सुतार संजय रावराणे, श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.माजी आमदार जठार म्हणाले, शिवसेना, भाजप आणि आरपीआय एकदिलाने व निर्मळ मनाने नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. आमचे जागावाटप निश्चित झाले आहे. तरीही जे काँग्रेस विरोधी ते आमचे व पर्यायाने जनतेचे असतील. या तत्त्वाने अशा संघटना, पक्ष यांना सामावून घेण्याची महायुतीची तयारी आहे. त्यामुळे जागांची आकडेवारी आमच्यासाठी महत्वाची नाही. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमची बोलणी सुरू राहतील. असे स्पष्ट करीत वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागात महायुती उमेदवार देणार आहे. असे सांगितले. नगरपंचायतीची निवडणूक ही जनतेच्या विकासासाठी लढली जाणारी लढाई आहे. केंद्रात आणि राज्यात शिवसेना, भाजप व मित्रपक्षांचे सरकार आहे. त्यामुळे नगरोत्थान विभागातून भरपूर निधी शहराच्या विकासासाठी आम्ही आणू शकतो. येथील नागरिकांनी सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. पुढच्या वर्षभरात १00 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.काँग्रेसला बळी पडू नकाअनेक वर्षे सत्तेत राहून भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा मतदारांना वाटण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल आणि तो वाटलेला पैसा वसूल करण्यासाठी नगरपंचायत विकायलाही ते कमी करणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला भुलून कोणीही चुकीचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन महायुतीच्यावतीने माजी आमदार प्रमोद जठार यांनी मतदारांना केले आहे.रणधुमाळीत नेतेमंडळीनगरपंचायतीच्या सर्व प्रभागात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत फिरुन प्रत्येक मतदाराला आपण व्यक्तीश: भेटणार आहोत. तसेच या रणधुमाळीत भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याचे संकेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले.