शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: April 19, 2016 00:35 IST

भाजप-सेनेला भोवली सत्तेची लालसा : काँग्रेसला ९, शिवसेना ६, भाजप १, अपक्ष १

कुडाळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवत कॉंगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेनेला सहा, भाजपसह अपक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. मतदारांनी काँग्रेस नेते,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी समोरासमोर उभी ठाकली होती. तर अपक्षांच्या सहभागानेही निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. चार फेरीत ही मतमोजणी होती. अवघ्या एका तासातच निकाल जाहीर झाला. पहिल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली. शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. तर सत्तेची स्वप्ने रंगवत राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपला मतदारांनी सपशेल नाकारले. केवळ एकाच जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. (प्रतिनिधी) नारायण राणे, नीतेश राणेंचा करिष्माकुडाळ शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने कितपत मतदान होईल, याबाबत काही सांगता येत नव्हते. मात्र, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांचा करिष्मा या निवडणुकीत चालल्याने या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. अनेक दिग्गज पराभूतया निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तत्कालीन सरपंच स्नेहल पडते, माजी सभापती शिल्पा घुर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे या व इतर अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप व सेना यांनी कुडाळ निवडणुकीत युती न करता स्वतंत्रपणे लढले. यावेळी दोन्ही पक्षांना सत्तेची लालसा भोवल्याची चर्चा मतमोजणी ठिकाणी सुरू होती. तर शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येही युती न केल्यानेच पराभव झाल्याचे बोलले जात होते.