शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

बौध्द समाजाच्या संघटनांचे ऐक्य!

By admin | Updated: March 30, 2015 00:22 IST

ऐतिहासिक निर्णय : चिपळुणात २५ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार

चिपळूण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटना एकवटल्या आहेत. या ऐक्याला ‘चिपळूण तालुका बौध्दजन समन्वय समिती’ असे नाव देण्यात आले असून, त्यांच्या वतीने प्रथमच दि. २५ एप्रिल रोजी चिपळुणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, याची घोषणा समन्वय समितीच्या सर्व नेत्यांनी बैठकीनंतर रविवारी करण्यात आली.चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समितीने तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय पक्ष संघटनांकडे पत्रव्यवहार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वांनी एकत्रितपणे साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याला सर्व संघेटनांनी पाठिंबा देऊन या संदर्भातील समन्वय समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात बौध्दजन पंचायत समितीचे प्रमुख शीलभद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यामध्ये हा निर्णय घोषित करण्यात आला. यापूर्वीच्या दोन बैठका हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील बैठक बौध्दमहासभेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनातून होणार असून, सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. स्मारकातून ध्वजारोहण, बौध्द पूजापाठ घेऊन चिपळूण शहरातून चित्ररथांसह भव्य मिरवणूक निघणार आहे. आंबेडकर चौकात जाहीर सभा, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमहोणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांकरिता दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चिपळुणातील डॉ. आंबेडकर स्मारक भवनात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. संघटनांच्या प्रतिनिधींची समन्वय समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस अशोक कदम, अशोक जाधव, सुदेश गमरे, संदेश पवार, मनोहर मोहिते, दिलीप मोहिते, रमाकांत सकपाळ, प्रभाकर सकपाळ, बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष सिताराम जाधव गुरूजी, सरचिटणीस उत्तम जाधव, तालुकाप्रमुख शीलभद्र जाधव, लक्ष्मण कदम, राजेश मोहिते, विलास मोहिते, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष जयरत्न कदम, सरचिटणीस महेंद्र कदम, डॉ. अशोक सकपाळ, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुभाष जाधव, नेते राजू जाधव, आरपीआय (ए) चे तालुकाध्यक्ष के. डी. कदम, नीतेश गमरे, प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, उमेश सकपाळ, आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा जाधव, प्रज्ञा बल्लाळ, सुमेधा तांबे, सुनंदा पवार, आरपीआय (कांबळे)चे नेते प्रभाकर जाधव, माधव पवार, सुभाष सावंत, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र कदम, महार रेजिमेंट माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम मोहिते, शांताराम सावंत, अशोक सावंत, त्रिरत्न बौध्द महासंघाचे अध्यक्ष अनंत हळदे,राजेशजाधव, बहुजन विचार मंचाचे अध्यक्ष संजय गमरे, सचिन गमरे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)गटातटांना विश्रांती ...चिपळुणात प्रथमच सर्व संघटना एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य करण्याची प्रतिज्ञा या साऱ्या मंडळींनी केली आहे. हा इतिहास चिपळूणमध्ये घडविण्याची किमया ज्येष्ठ मंडळींनी केली. जाधव व वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने हा प्रयत्न केला व त्याला यशही आले.